नाशिक : प्रतिनिधी
बिलांमध्ये त्रुटी न काढता प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीच्या दोघा अधिकार्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. अमर अशोक खोंडे, व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग महावितरण कंपनी धुळे आणि मनोज अरुण पगार उप व्यवस्थापक अशी या दोघा लाचखोर अधिकार्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांचे मंहावितरण कंपनीकडे 2018-19 या वर्षात 56,31, 590 रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्या कामाच्या सादर केलेल्या बिलात त्रुटी न काढता प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात दोन्ही अधिकार्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागीतली होती. तडजोडीअंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले.पहिला हफ्ता दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, सुधीर मोरे, रामदार बारेला, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे यांनी ही कारवाई केली.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…