इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायत येथे एक कोटी ९ २ लाखांच्या पाणीपुरवठा योजने संदर्भात पर्यटनमंत्री ना . आदित्य ठाकरे हे आज भेट देणार आहेत . दरम्यान सकाळी सात वाजता ना . आदित्य ठाकरे हे वर्षा निवासस्थान मुंबई येथून मोटारीने इगतपुरी येथील मानस हॉटेल येथे सकाळी ९ : ३० वाजता येणार आहेत . त्यानंतर खंबाळे येथील डहाळेवाडी येथे १०:२० मिनिटांनी पोहोचतील . त्यानंतर घोटीमधून त्र्यंबकेश्वर येथे दौरा करणार आहेत . यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ , आरोग्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित राहणार असून मंत्री ना . आदित्य ठाकरे हे पाणी पुरवठा योजनेसंदर्भात संवाद साधणार आहेत . मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे . खंबाळे येथील डहाळेवाडी येथे पर्यटन मंत्री ना आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असून खंबाळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच , उपसरपंच व सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे .