नाशिक

लाकूड खरेदीच्या बहाण्याने व्यापार्‍याचे अपहरण

खंडणीचा व्यवहार सुरू असताना पोलिसांचा छापा, चौघे गजाआड

निफाड : तालुका प्रतिनिधी
बाभळीचे लाकूड खरेदी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून आलेल्या एका व्यापार्‍याचे अपहरण करून दोन लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना सायखेडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. खंडणीची रक्कम 80 हजार रुपयांवर निश्चित करण्याचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून व्यापार्‍याची सुखरूप सुटका केली.
आसिफ नसीम पठाण (वय 34, रा. लाकूड बाजार, भोकरदन, जि. जालना) हे लाकूड व्यापाराच्या निमित्ताने निफाड तालुक्यात आले होते. संशयितांनी चांदोरी परिसरात त्यांना बाभळीचे लाकूड दाखवले. तेथून परतत असताना भेंडाळी सबस्टेशनजवळ संशयितांनी त्यांचा रस्ता अडवला व त्यांना जबरदस्तीने कारमध्ये डांबून मारहाण केली. संशयितांनी पठाण यांच्या खिशातील 9 हजार रुपये आणि मोबाइल काढून घेतला व त्यांच्या मित्र-नातेवाइकांकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलिसांच्या पथकाने तातडीने सापळा रचला. खंडणीची रक्कम 80 हजार रुपयांवर आणण्याची बोलणी सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून व्यापार्‍याची सुटका केली.
या प्रकरणी आनंद भीमा भोसले, परशुराम शिवाजी जाधव, बाबू लक्ष्मण गायकवाड आणि रतन रायप्पा मोरे या चौघांवर भारतीय न्याय संहितामधील विविध कलमांन्वये सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, पी.एस. आय. अशोक मोकळ, पोलीस हवालदार जितू पाटोळे, संतोष माळोदे, रमेश गांगुर्डे, मोठाभाऊ जाधव, पानसरे, तसेच निफाड पोलीस ठाण्याचे धनंजय जाधव व राजेंद्र दराडे यांच्या पथकाने केली.

दरोड्याच्या गुन्ह्यात संशयित फरार

तपासादरम्यान अटकेतील संशयित परशुराम शिवाजी जाधव हा मध्य प्रदेशातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस जाहीर केले होते. सायखेडा पोलिसांकडून याबाबतची माहिती संबंधित राज्यातील पोलिसांना देण्यात येत आहे.

Trader kidnapped under the pretext of purchasing wood.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago