नाशिक

नाशिकच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

18 ते 24 सप्टेंबरदरम्यान सायंकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत दहा मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

सिडको : प्रतिनिधी
गणेशोत्सवातील आरास आणि देखावे पाहण्यासाठी नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. बी. डी. भालेकर मैदान, शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ परिसरातील गर्दी टाळण्यासाठी 18 ते 24 सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दहा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत संबंधित मार्ग ‘वाहनविरहित’ करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच या परिसरातील रहिवाशांची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी( मुख्यालय/वाहतूक) यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हे निर्बंध 18 ते 24 सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत किंवा गणपती आरास संपेपर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यान, वाहतूक निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात
आले आहे.
ही अधिसूचना पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी जारी केली आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

खडकाळी सिग्नल-किटकॅट कॉर्नर-मोडक सिग्नल-सीबीएस सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रामवाडीमार्गे मखमलाबाद नाका-पेठनाका-दिंडोरी नाका या मार्गाचा वापर करता येईल.
मुंबई नाका-गडकरी सिग्नल-मोडक सिग्नल-सीबीएस सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभमार्गे पुढे जाता येईल.
सीबीएस सिग्नल-मोडक सिग्नल-गडकरी सिग्नल-मुंबई नाका या मार्गाचा वापर करता येईल.
मालेगाव स्टॅण्ड-मखमलाबाद नाका-रामवाडी-जुना गंगापूर नाका सिग्नलमार्गे पुढे जाता येईल.

या मार्गांवर प्रवेशबंदी

1. अण्णा भाऊ साठे पुतळा (किटकॅट चौक) ते कालिदास कलामंदिर मार्गे सुमंगल कपड्यांच्या दुकानापर्यंत, शालिमार चौकाच्या दिशेने ये-जा करणार्‍या सर्व वाहनांना प्रवेशबंदी. 2. सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडीमार्गे बी. डी. भालेकर मैदानापर्यंत दोन्ही दिशेची वाहतूक बंद. 3. खडकाळी सिग्नल ते शालिमार आणि सीबीएसकडे ये-जा करणार्‍या दोन्ही दिशांच्या वाहतुकीवर निर्बंध. 4. दीपसन्स कॉर्नर-नेहरू गार्डनकडून गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत ये-जा करणार्‍या वाहनांना प्रवेशबंदी. 5. खडकाळी सिग्नल, त्र्यंबक पोलीस चौकी, पिंपळ चौक ते गाडगे महाराज पुतळा या मार्गावरील वाहतूक बंद. 6. बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा तसेच धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नर या मार्गावर वाहतूक बंद.
7. मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल आणि धुमाळ पॉइंटमार्गे दहीपूलकडे ये-जा करणार्‍या वाहनांना प्रवेशबंदी. 8. प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेशबंदी.
9. अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहनांना प्रवेशबंदी. 10. रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नलमार्गे शालिमारकडे येणार्‍या वाहनांना प्रवेशबंदी.

Traffic changes in the central part of Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 days ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 days ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 days ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 days ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 days ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 days ago