सिडको : प्रतिनिधी
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त 3 जुलैपर्यंत नाशिक शहरातील विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय टाळावी, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने ही अधिसूचना जारी केली आहे.
1 जुलै रोजी सातपूर, सीबीएस, रविवार कारंजा, मेनरोड, दूधबाजार, काजीपुरा, पंचवटी मार्गे गणेशवाडी येथे पालखीचा मुक्काम असेल. 2 जुलै रोजी अमरधाम, काठे गल्ली, नाशिकरोड, पळसेमार्गे पालखी पुढे रवाना होईल, 3 जुलै रोजी पुणे रोडमार्गे ग्रामीण हद्दीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी मार्गावरील विविध रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. संस्कृती हॉटेल ते महिंद्रा सर्कल, मायको सर्कल ते एबीबी सिग्नल, मोडक सिग्नल ते अशोकस्तंभ, अशोकस्तंभ ते रविवार कारंजा, रविवार कारंजा ते दूधबाजार, महात्मा फुले मार्केट ते काजीपुरा चौकी, तसेच द्वारका, काठे गल्ली, नाशिकरोड आणि बिटको चौक परिसरातील काही मार्गांवर सर्वसामान्य वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. काही ठिकाणी जड व अवजड वाहनांनाही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, सातपूर, अंबड, अशोकनगर, पंढरीनाथ गांगुर्डे मार्ग, सकाळ सर्कल, आयटीआय सिग्नल, संभाजी चौक, खडकाळी, सारडा सर्कल, जेलरोड, वीर सावरकर पूल आणि सिन्नर फाटा आदी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे निर्बंध 3 जुलै रोजी पालखी नाशिक शहराची हद्द सोडेपर्यंत लागू राहतील. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका तसेच पोलीस सेवेत वापरली जाणारी वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. परिस्थितीनुसार वाहतुकीच्या नियोजनात आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांनी राखून ठेवले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मोटार वाहन अधिनियम तसेच मुंबई पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त चंद्रकांत गवळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
Traffic changes in the city for the Palkhi procession.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…