ट्रॅजेडी क्वीन ” मीनाकुमारी “..

३१ मार्च …
याच दिवशी ५० वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने आपला अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप मुंबई येथे सेंट एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये घेतला . ते साल होते १९७२ . उणेपुरे ३९ वर्षाचे आयुष्य या अभिनेत्रीला लाभले .तिचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी मुंबई येथे झाला अभिनय, गायक व कवी अशा विविध क्षेत्रात तिचे कमाली चे प्रभुत्व होते. ” नाझ ” या टोपण नावाने तिला ओळखले जाते. तिला भारतीय सिनेमाचे ” सिंड्रेला ” असेही म्हटले जाते. तिचे खरे नाव होते महजबी बानो. तिच्या जन्माच्या वेळी तिचे वडील अलिबख्श व आई इकबाल बेगम यांचे कडे डॉक्टरांना देण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. अशा गरीब परिस्थितीत मीनाकुमारी चे बालपण गेले.

वयाच्या सहाव्या वर्षीच तिने सिनेमा सृष्टीत प्रदार्पण केले . अनेक शोकाकुल व शोकात्मक अशा भूमिकेमुळे तिला ” ट्रॅजेडी क्वीन ” असेही म्हटले जाते . एकूण ३३ वर्षे तिने सिनेमा सृष्टीवर अधिराज्य गाजविले . कमल अमरोही बरोबर तिचे वैवाहिक आयुष्य जेमतेम १० वर्ष एवढेच होते . मीनाकुमारीने एकूण ९४ सिनेमा मध्ये अभिनेत्री म्हणून काम केले .या पैकी साहेब बीबी और गुलाम, पाकिझा , आरती, बैजू बावरा , प्रणिता, दिल आपण और प्रीत पराई फूट पाथ . काजल इत्यादी सिनेमांचा समावेश होतो .बैजू बावरा या १९५२ साली रिलीज झालेल्या चित्रपटाने मीनाकुमारीची प्रसिद्धी साऱ्या भारतभर झाली . तसेच पाकिझा या १९७२ साली रिलीज झालेल्या सिनेमाने तिला तिच्या मृत्यू नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली . चित्रपट क्षेत्रातील एक सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला ही मीनाकुमारीची अतिशय आवडती होती . सिनेक्षेत्रातील एका अग्रगण्य सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांनी मीनाकुमारी बद्दल अतिशय गौरवोद्गार काढले आहेत . त्यांच्या मते मीनाकुमारीची अभिनयातील क्षमता उच्च कोटीची होती . गुलझार सारखा कवी म्हणतो ” मीनाकुमारी म्हणजे साक्षात कविताच होती.”

मीनाकुमारी एवढा लोकप्रिय कलाकार होणे दुर्मिळ आहे . कमल अमरोही बरोबर तिचा १९६४ साली घटस्फोट झाला . मीनाकुमारी अखेरीस निराशेच्या खाईत गेली . या निराशेपोटी डॉक्टरांनी तिला ब्रँडीचा डोस औषध म्हणून देण्यास सुरवात केली . त्याचे तिला व्यसनच लागले . तिला शेवटी लिव्हर सिरासीस झाला त्यातच तिने ३१ मार्च १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला . जिवंत पणीच आख्यायिका बनलेल्या मीनाकुमारीच्या आयुष्याची अद्भुत कहाणी पुढे लोक वाचताच राहतील मीनाकुमारी आयुषयभर खरे प्रेम शोधत राहिली पण त्याचा शोध मात्र तिच्या मृत्यू नंतरचा थांबला . मीनाकुमारीला एकूण १९५४, १९५५ १९६३ व १९६६ अशा चार वर्षे फिल्मफेअर अवार्ड मिळाले होते . भारत सरकारने या अभिनेत्रींच्या स्मरणार्थ २०११ साली पोस्टाचे तिकीट काढले होते मीना कुमारने आपल्या कबरीवर खाली ल शब्द लिहण्याची विनंती केली होती.

 

” वो अपनी जिंदगी को
एक अधुरे साज
एक अधुरे गीत … एक तुटे दिल
परंतु बिना किसी अफसोस
के साथ समाप्त हो गयी “

==
शांताराम वाघ पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *