बच्छाव थेट गडचिरोलीला, नाशिकला दिग्रजकर
नाशिक ः प्रतिनिधी
शिक्षण विभागातील 16 अधिकार्यांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांची अमरावती येथे विभागीय सचिव एसएससी बोर्ड येथे, तर त्यांच्या जागेवर नाशिक येथे संजयकुमार राठोड यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांची थेट गडचिरोलीला बदली झाली आहे. माध्यमिकचे प्रवीण पाटील यांची चंद्रपूरला बदली झाली. त्यांच्या जागी हिंगोलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रजकर यांची नियुक्ती झाली.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी गुरुवारी (दि.19) राज्यातील शिक्षणाधिकार्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला.नाशिक जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची चंद्रपूरला योजना विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून यापूर्वीच बदली करण्यात आली होती. पण तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आल्याने त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. आता कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली करण्यात आली आहे.डॉ. नितीन बच्छाव यांची गडचिरोलीला योजना शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर नवीन शिक्षणाधिकारी नियुक्त झालेले नाहीत.
डॉ. वैशाली झनकर नाशिकला माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडल्या होत्या. त्या मुंबईत योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नवीन आदेशानुसार त्यांची बदली मुंबई दक्षिण विभागात शिक्षण निरीक्षकपदी करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…