शालेय विद्यार्थ्यांची रुग्णवाहिकेतून ने-आण

देवळाली कॅन्टोन्मेंटचा अजब कारभार

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाच्या आवारातच विशेष मुलांसाठी उपचार व प्रशिक्षण केंद्र सुरू असून, येथे दिव्यांग व विशेष गरजा असलेले विद्यार्थी शिक्षण, प्रशिक्षण आणि भौतिक उपचार (फिजिओथेरपी) घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून स्कूल बस उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, स्कूल बस नादुरुस्त होऊन बंद पडली असताना पर्यायी स्कूल बसची व्यवस्था करण्याऐवजी चक्क रुग्णवाहिकेतून विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयाच्या आवारात हे विशेष मुलांसाठीचे केंद्र आहे, त्याच रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. रुग्णवाहिका ही प्रामुख्याने रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी असते. मग दिव्यांग व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या नियमित वाहतुकीसाठी रुग्णवाहिकेचा वापर का केला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Transportation of school students via ambulance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *