नाशिक

झाडांची मुळं उठली नागरिकांच्या जीवावर

खोदकामामुळे झाडे कोसळण्याचा वाढला धोका

नाशिक : प्रतिनिधी
शहराच्या विविध भागांत करण्यात आलेल्या खोदकामानंतर झाडांची मुळं उघडी पडली आहेत. परिणामी झाडे कोसळून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत शहराच्या विविध भागांत झाडे कोसळली. सातपूरच्या शिवाजीनगर भागात रिक्षावर झाड कोसळले. सुदैवाने या रिक्षात कुणी नव्हते. त्यामुळे दुर्घटना टळली. मात्र, महापालिकेने यापासून बोध घेऊन धोकादायक झाडे तातडीने तोडण्याची गरज आहे.
गंगापूर रोडच्या कडेला अनेक झाडांची मुळं खोदकामात उघडी पडली आहेत. खोदकामानंतर रस्ते योग्यरीत्या न बुजविल्यामुळे पहिल्याच पावसात वाहने या रस्त्याच्या कडेला फसली होती.
गंगापूर रोडच्या कडेला बेंडकुळेनगरपासून ते बारदान फाट्यापर्यंत अनेक झाडे आहेत. या झाडाच्या कडेलाच युटिलिटीसाठी रस्त्याचे खोदकाम केले. त्यामुळे झाडांची मुळं उघडी पडली आहेत. ही झाडे आगामी काळातील पावसाचे वातावरण लक्षात घेता कोसळू शकतात. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच गर्दी असते. झाड कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करणे गरचेेचे आहे. मुंबईला स्कूल व्हॅनवर झाड कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे नाशिकमध्येदेखील खोदकामात मुळं उघडी पडलेली झाडे तातडीने दुसरीकडे पुनर्रोपण करण्याची गरज आहे.

Tree roots have become a threat to citizens’ lives.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago