हजारो भक्तांनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन; भाविकांना दर्शनबारीत दुर्गंधीचा त्रास
त्र्यंबकेश्वर :
दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांची गर्दी उसळली आहे. रविवारी महाशिवरात्रीचा पर्वकाळ साधण्यासाठी गर्दीचा उच्चांक गाठला गेला. त्र्यंबकेश्वर महादेवाचे (त्र्यंबकराजाचे) दर्शन घेण्यासाठी पहाटे चारपासून भक्तांंनी रांगा लावल्या होत्या. शुक्रवारी दिवसभर व शनिवारी रात्रीपासूनच गर्दीत वाढ झाली. देवस्थान ट्रस्टने 200 रुपये थेट दर्शनबारी बंद ठेवली होती. त्यामुळे पूर्वदरवाजा दर्शनबारी या एकमेव रांगेतून भाविकांना प्रवेश देण्यात आला. व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे पत्रक देवस्थान ट्रस्टने प्रसिद्ध केले. मात्र, प्रत्यक्षात ट्रस्ट इमारतीच्या दरवाजाने शासकीय अधिकारी, राजकीय नेते यांच्या आप्तेष्ट, मित्रमंडळींची ये-जा सुरू असलेली पाहावयास मिळाली.
दर्शनबारी थेट ब्रह्मगिरी पायथ्याला असलेल्या अहिल्या धरणाच्या घाटापर्यंत पोहोचली होती. गोदावरी नदीच्या काठाने उभे राहिलेले भाविक कचरा डेपोच्या दुर्गंधीने त्रासलेले दिसत होते. मागच्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या बाजूला गोदावरीच्या घाटावर असलेल्या कचरा डेपोची दुर्गंधी पसरली आहे. त्याचा प्रादुर्भाव गावभर जाणवतो आहे. दर्शनबारी कचरा डेपोपासून जवळच आहे. त्यातही या भागात दर्शनासाठी भाविकांना तीन तास थांबावे लागले.दुर्गंधीने घसा आणि डोके दुखत असल्याची तक्रार भाविक करत होते.
पहाटे मंदिर उघडले तेव्हा सर्वप्रथम चार वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांनी पर्व स्नान करत मिरवणुकीने जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रांगेत थांबलेल्या भक्तांंना दर्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या त्रिकाल पूजा वेळेत झाल्या. दरम्यान, दुपारी 3 ते 5 दरम्यान प्रदोष पुष्प पूजक डॉ.ओमकार आराधी यांनी नित्य प्रदोष पूजा केली. सायंकाळी पाच वाजेनंतर महाशिवरात्रीस होणारी ट्रस्टची लघुरुद्र पूजा करण्यात आली.
ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी आणि प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी झाली होती. पहाटेपासून भाविक रवाना झाले होते. शहरातील सर्वच शिवमंदिरांमध्ये गर्दी होती. दुपारी तीनच्या सुमारास त्र्यंबकराजाची पालखी निघाली. पालखी पाचआळी भागातून पूर्व संस्थानिक जोगळेकर वाड्यावरून कुशावर्तावर स्नानासाठी आली. पालखीसोबत पुजारी, शागीर्द, विश्वस्त, मानकरी, ग्रामस्थ यांसह भक्तांची
उपस्थिती होती.
भाविक प्रवाशांची पायपीट
शहरात दिवसभर शिव भजनांचा गजर सुरू होता. नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी महामंडळाची दर अर्ध्या तासाला बस सोडण्यात येत होती. त्याचसोबत सिटीलिंकच्या जादा बसदेखील सोडण्यात आल्या होत्या. सिटीलिंक आणि एसटी बस यांचे नेहमीचे स्थानक बंद केल्याने भाविक प्रवाशांना दूर अंतरावरून पायी जावे लागले. यामध्ये वयोवृद्ध महिला, दिव्यांगांना यातना सहन करावी लागली.
Trimbaknagari erupted with the cheers of ‘Bam Bam Bhole’
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…