नाशिक

तिहेरी हत्याकांडातील आरोपीला मरेपर्यंत फाशी

सिडको : प्रतिनिधी
पंचवटी परिसरात 2018 मध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. पत्नी, मुलगी आणि नातीला जिवंत जाळून ठार मारल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास कालिकानगर, दिंडोरी रोड परिसरातील घरात ही घटना घडली होती. संगीता सुरेश देवरे यांच्यासोबत राहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपी जलालउद्दीन अलीमोहम्मद मलिक ऊर्फ खान साहेब याने धमकी दिली होती. त्यानंतर त्याने पेट्रोलपंपावरून डिझेल आणून घरात झोपलेल्या संगीता देवरे, त्यांची मुलगी प्रीती शेंडगे आणि नऊ महिन्यांची नात सिद्धी यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जिवंत जाळले. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला होता.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ, व्ही. डी. शार्दूल आणि पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 4 येथे झाली. न्यायाधीश एस. बी. भंसाळी यांनी साक्षीदारांचे जबाब, पंचनामे आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण आणि अनिल बागले यांनी काम पाहिले.

Triple murder accused sentenced to death

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

18 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

5 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago