नाशिक

गंगापूर कॅनॉलवर गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला

पंचवटी : प्रतिनिधी
मखमलाबाद रस्त्यावर फडोळ मळाजवळील गंगापूर कॅनॉलवरील वळणावर गॅस सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची मंगळवारी (दि. 12) रात्री घडली.
सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅस सिलिंडर रस्त्यावर व पाटाजवळ खड्ड्यात पडले होते.सदर घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बुधवारी (दि. 13) दुपारी क्रेनच्या सहाय्याने उलटलेला ट्रक उभा करण्यात आला. घरगुती गॅश सिलिंडर वाहतूक करणारा आयशर ट्रक (एमएच15-एचएच 3565) फडोळ मळा गंगापूर कॅनॉल रस्त्याने जाताना चालकाला अंदाज न आल्याने ट्रक मागे घेण्याच्या प्रयत्नात उलटला. त्यानंतर सिलिंडर रस्त्यावर पडले. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, याठिकाणी अग्निशमन दलाची गाडीदेखील पाचारण करण्यात आली होती. ट्रक उलटल्यामुळे या रस्त्याने गंगापूरकडे जाणार्‍या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या श्याम सुरेश जाधव (वय 57, रा. दिंडोरी) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई भूषण साळवे यांनी फिर्याद दाखल केली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तू शेळके तपास करीत आहेत.

Truck transporting gas cylinders overturns on Gangapur Canal

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

2 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago