राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

इबोला व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क!

देशातील सर्व विमानतळे, बंदरांवर ‘स्क्रीनिंग’ सुरू

नवी दिल्ली :
जगातील वाढत्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेतील वाढता प्रादुर्भाव पाहून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ (जागतिक आरोग्य आणीबाणी) घोषित केल्यानंतर, भारत सरकारने तातडीने देशव्यापी ‘हेल्थ अ‍ॅडव्हायझरी’ जारी केली आहे. देशात व्हायरसचा शिरकाव रोखण्यासाठी सर्व विमानतळे, बंदरे आणि आंतरराष्ट्रीय एंट्री पॉइंट्सवर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची कडक स्क्रीनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये वेगाने होत आहे. काँगो, युगांडा, सुदान, गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये या आजाराने आतापर्यंत 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 500 हून अधिक जण बाधित आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाधित देशांतून येणार्‍या प्रवाशांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळल्यास, त्यांनी इमिग्रेशन तपासणीपूर्वीच विमानतळावरील हेल्प डेस्क किंवा आरोग्य अधिकार्‍यांना त्वरित माहिती देणे बंधनकारक आहे. याशिवाय, कोणताही प्रवासी नकळत जरी एखाद्या इबोला बाधिताच्या संपर्कात आला असेल, तर त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागाला कळवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. इबोलाबाबत गांभीर्य न बाळगल्यास कोरोना महामारीसारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने
दिला आहे.

Central government on alert regarding Ebola virus!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago