अडीच वर्षाच्या मुलीवर चुलत काकाकडून बलात्कार
दिंडोरी: प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील चारोसे येथे एका अडीच वर्षांच्या मुलीवर चुलत काकाने बलात्कार केल्याची प्रकार उघडकीस आला या बाबत वणी पोलीस ठाण्यात पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
वणी पोलीस ठाणे हद्दीत चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी दि.१३जुन रोजी सायंकाळी ०५:३० वाजता सुमारास घरासमोर खेळत असताना पंडीत मुलीचा चुलत काका याने तिला घरासमोर घेऊन गेला. मुलगी बराच वेळ झाले दिसत नाही म्हणून तिचे घरातील व आजू बाजूचे लोकांनी तिचा शोध घेत असताना रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयीत आरोपी मुलीसह दिसुन आला. त्याने अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले या बाबत पीडीत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर बाबत मुलीचे आईचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पोकसो कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून.पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील करीत आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…