नाशिक

हॉटेल पेटवण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक

अन्य दोघांचा शोध सुरू

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील हॉटेल कुमारा बिअर बारला जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार संशयित आरोपी दुचाकीवरून हॉटेल कुमारा येथे आले. त्यावेळी हॉटेल बंद होते आणि गेट लावलेले होते. तरीही त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या ज्वलनशील पदार्थांच्या बाटल्या हॉटेलच्या दिशेने फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. या आगीत हॉटेलचे फ्लेक्स बोर्ड, बाह्य लायटिंग व दोन सोफे अर्धवट जळाले असून, हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शोध पथकाने तत्परतेने तपास सुरू केला होता.
याचवेळी आरोपी जेहान सर्कल परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती सागर गुंजाळ यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बबलू रमेश पटेल (24, रा. शिवाजीनगर) व वैभव शिवाजी साळुंके (28, रा. सातपूर) यांना अटक केली. उर्वरित दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वास पाटील, पो. उपनिरीक्षक राहुल नळकांडे, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, भूषण शेजवळ, योगेश गायकवाड व सचिन अजबे यांच्या पथकाने केली.

 

Gavkari Admin

Recent Posts

रुग्णालयातून बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला.. तरुणाला नागरिकांनी दिला चोप

मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…

3 hours ago

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…

13 hours ago

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर   उपचार सुरू मोखाडा:   …

18 hours ago

आधी प्रेम… मग लिव्ह इन अन नंतर …

आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…

22 hours ago

दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

  दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…

1 day ago

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

3 days ago