38 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सिडको : विशेष प्रतिनिधी
गुलशन कॉलनी, मुंबई नाका येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 व 2 च्या पथकाने रेकॉर्डवरील चार आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून 38 लाख 58 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 मे ते 26 मे 2025 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका बंगल्याचे शटर तोडून त्यामधून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट 1 व 2 ने घटनास्थळ परिसरातील सुमारे 25 किलोमीटरचा सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला. यावरून शहबाज खान, जावेद खान, महेश व्यवहारे, उत्तम मुंजे, नावीद हाशमी, आत्त्या उर्फ अल्ताफ सय्यद या आरोपींची ओळख पटली. या आरोपींपैकी काहीजण त्र्यंबकेश्वर ते पहिने रस्त्यावरून इर्टिगा ( 05 4298) गाडीने चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी नाबीद अल्ताफ हाशमी, शेहबाज जावेद खान, उत्तम धोंडीराम मुंजे व महेश मधुकर व्यवहारे यांच्याकडून 36 तोळे सोन्याचे दागिने, 204.7 ग्रॅम चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाइल फोन असा एकूण 38 लाख, 58 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.विशेष बाब म्हणजे, आरोपी नाबीद हाशमी हा फिर्यादीच्या मुलाचा मित्र असून, गुन्हा घडल्यानंतरही तो घटनास्थळी उपस्थित राहून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होता, हेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, हिरामण भोये, पोउनि चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, महेश साळुंके, रेमश कोळी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, विलास चारोस्कर, किरण शिरसाठ, समाधान पवार तसेच गुन्हे शाखा युनिट 2 कडील समाधान हिरे, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, तांत्रिक विश्लेषण शाखेचे सपोनि जया तारडे, योगेश वाजे, हर्षद महाले, भूषण पवार व संदीप बर्डे आदींनी केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…