17 जणांसह 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हिसवाळ येथे कुरापत काढून दोघा भावांवर कुर्हाड व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी 17 जणांसह 25 ते 30 स्त्री-पुरुषांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जितेंद्र दिगंबर चव्हाण (वय 47, रा. हिसवाळ) व त्यांचे भाऊ भूपेंद्र चव्हाण हे गावातील गेट क्रमांक 2 जवळ असताना, जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्यावर हल्ला केला. संशयितांनी कुर्हाड तसेच लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी अमृत आनंदा सोनवणे (वय 39), बापू सोनवणे, सुनील सोनवणे, प्रताप माळी, भुरा सोनवणे, मुळचंद, शरद, रक्या, धाक्या, सुनील डान्सर, अमृत सोनवणे यांची पत्नी, त्यांची बहीण, हिरामण गायकवाड तसेच इतर 25 ते 30 स्त्री-पुरुष (सर्व रा. आदिवासी वस्ती, हिसवाळ) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार भदाणे करीत आहेत.
Two attacked with an axe and a club over an old dispute.