नाशिक

चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस; दोन आरोपी जेरबंद

चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस; दोन आरोपी जेरबंद

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांप्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्र. 2 ने दोन आरोपींना अटक केली. एकूण तीन लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजेच्या फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञाताने हिसकावून पळ काढला होता. या घटनेप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन जवळपास 60 ठिकाणच्या सीसीटीव्ही
फुटेजची तपासणी केली. त्यातून मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या राहत्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला.
20 सप्टेंबर रोजी पोलीस हवालदार मनोज परदेशी व अतुल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आर्यन केटरर्स, विनयनगर येथे सलमान नावाची व्यक्ती सोन्याची माळ विकण्यासाठी उभी आहे, अशी माहिती मिळाली. पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपी सलमान छंगा खान (वय 30, रा. उत्तर प्रदेश, सध्या विनयनगर, नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून इंदिरानगर प्रकरणातील मंगळसूत्र, बजाज ॲक्टिव्हा मोपेड, मोबाइल असा एकूण दोन लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पुढील चौकशीदरम्यान सलमान खान याने 27 एप्रिल 2025 रोजी नाशिकरोड येथील दत्तमंदिराजवळ एका महिलेकडून जबरदस्तीने मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील सोन्याची चेन त्याने आपला मित्र अमोल मधुकर शहाणे (वय 46, रा. नवरंग कॉलनी, नाशिकरोड) याला विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून 14 ग्रॅम वजनाची, एक लाख 19 हजार रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. या प्रकरणात इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील एकूण तीन लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, मनोज परदेशी, अतुल पाटील, प्रकाश बोडके, नंदकुमार नांदुर्डीकर, वाल्मीक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रवीण वानखेडे, यांनी केली.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

7 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago