एसआयआर यादी जाहीर
मुंबई :
राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘विशेष सखोल पुनरीक्षण-2026’ अंतर्गत राज्याची नवी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून राज्यातील तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सखोल पुनरीक्षणाची ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी राज्यात एकूण 9,78,54,049 नोंदणीकृत मतदार होते. परंतु नव्याने प्रसिद्ध झालेल्या मसुद्यात 7,71,65,562 (78.86 टक्के) मतदारांचाच समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे, गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे तब्बल 2,06,88,487 (21.14 टक्के) मतदारांची नावे सध्याच्या यादीत समाविष्ट झालेली नाहीत. या नव्या प्रारूप यादीत पुरुष मतदारांची संख्या 3,95,89,905 इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या 3,75,72,570 एवढी नोंदवण्यात आली आहे. याशिवाय 3,087 तृतीयपंथी मतदारांचा यादीत समावेश आहे. तुमचे नाव मतदार यादीत सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे आता प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारांनी त्यांचे नाव निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. सीइओ महाराष्ट्र या लिंकवर जाऊन प्रारुप मतदार यादी 2026 यावर आपले नाव तपासावे. वगळण्यात आलेल्या किंवा नवीन नाव नोंदवू इच्छिणार्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी आणि दावे व हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर सर्व अर्जांची छाननी करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदारही यासाठी पात्र ठरणार आहेत.
Two crore voters in the state excluded.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…