स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; चोरीच्या 10 दुचाकी जप्त, 7 गुन्हे उघडकीस
सिन्नर : प्रतिनिधी
मोटारसायकल चोरी करून त्यांची विक्री करणार्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढुर्ली परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांकडून चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून चोरीचे सात गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, टोळीचा म्होरक्या मात्र फरारी आहे.
अजय दत्तात्रय दळवी (21) रा. विंचूरदळवी, भावदेववाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक आणि अनिकेत श्रीधर मानकर (24) रा. राहुरी – भगूर पांढुर्ली रोड ता. जि. नाशिक अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके रा. विंचूरदळवी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चिंचोली येथील चोरलेल्या एका दुचाकीच्या शोधार्थ पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत काही चोरटे चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी पांढुर्ली येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपूर परिसरातून 10 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यातून सात गुन्हे हे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरट यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
या दुचाकी केल्या जप्त
गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या 4 हिरो स्प्लेंडर, एक बजाज 220 पल्सर, 1 बजाज प्लॅटिना, 2 बजाज पल्सर, 1 रॉयल एनफिल्ड बुलेट, 1 होंडा यूनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या 10 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. त्यांची किंमत 8 लाख 35 हजार रुपये इतकी आहे. सिन्नर पोलीस स्टेशनकडे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात या मोटरसायकल चोरांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहे.
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…