नाशिक

दोनशे कोटींच्या जलवाहिनीला ऑक्टोबर अखेरचा अल्टिमेटम

मनपाचा मक्तेदाराला निर्वाणीचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून दोनशे कोटींच्या जलवाहिनीचे काम करत आहे. गंगापूर ते बारा बंगला जलवाहिननीचे काम मार्च 2024 पासून हाती घेतले आहे. अठराशे मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम मार्च 2026 मध्येच होणे अपेक्षित होते. पण मक्तेदाराच्या कासवगती कामामुळे अद्याप ते सुरू आहे. पाणीपुरवठा विभाग दिवसाला अडीच लाखाचा दंड आकारत आहे. दरम्यान, प्रशासनाने या मक्तेदाराला जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
थेट जलवाहिनीच्या कामामुळे पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व, पश्चिम, सिडको या विभागांतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पण कामातील दिरंगाईचा फटका प्रकल्पाला बसल्याने प्रशासन नगरसेवकांच्या टीकेचे धनी बनले आहे. प्रशासनाने ठेकेदाराला 1 ते 15 मे दरम्यान प्रतिदिन एक लाख रुपये, तर 16 मे पासून ते आतापर्यंत प्रतिदिन अडीच लाख रुपये दंड वसूल केला जात आहे. जिंदाल (जेडब्ल्यूएल) या कंपनीकडून हे काम केले जात आहे. गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्ववाहिनी जलवाहिनी विस्ताराचे काम सुरू आहे. मनपाने सप्टेंबर 2025 मध्ये मक्तेदाराला 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती; परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून 1 मे पासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून बारा बंगला जलशुद्धीकरण व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचवले जाते. तेथे पाण्याचे शुद्धीकरण करून पुढे घरोघरी पुरवठा होतो. शहराची वाढती लोकसंख्या पाहता जलवाहिनीची क्षमता वाढविण्याचे ठरविण्यात आले. याआधीची वाहिनी जीर्ण झाल्याने पाणीगळती होत आहे.

गंगापूर थेट जलवाहिनीचे काम करणार्‍या मक्तेदाराला ऑक्टोबरअखेर काम मार्गी लावण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. या मुदतीतही काम न झाल्यास प्रशासकीय पातळीवर कारवाई केली जाईल. सध्या दिवसाला अडीच लाखाचा दंड आकारला जात आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

 

Ultimatum set for end of October for ₹200-crore water pipeline project.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

3 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

3 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

3 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

3 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

3 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

3 hours ago