लाईफस्टाइल

छत्र्यांचाही फॅशनेबल तडका

पावसाळा म्हणजे फक्त पावसाचा आनंद नाही, तर फॅशनचाही एक स्पेशल हंगाम! या हंगामाची खरी स्टाइल हिरोइन म्हणजे छत्री! हो, अगदी बरोबर वाचलंत. आता छत्री ही केवळ भिजण्यापासून वाचवणारी वस्तू राहिली नाही. ती बनली आहे कॉलेज तरुणींचं स्टायलिश स्टेटमेंट.
छत्री म्हणजे फक्त सावली नव्हे- ती आहे तुमची व्यक्तीशैली. पारंपरिक काळात छत्री ही काळ्या कापडाची, तशीच साधी आणि फक्त गरजेपुरती वापरण्यात येणारी वस्तू होती. पण आजची कॉलेज तरुणी छत्रीला नव्या नजरेने पाहते. कधी फ्लोरल, कधी ट्रान्सपरंट, कधी कार्टून प्रिंट्स आणि कधी बोल्ड मोनोक्रोम- छत्रीही आता लूकचं फॅशनेबल एक्स्टेंशन झाली आहे.
कलर ब्लास्ट : छत्र्यांचं रंगीत स्वप्न
कॉलेजच्या गेटमधून आत येताना जर एखादी मुलगी हातात पेस्टल ब्लू ट्रान्सपरंट छत्री घेऊन येते, तर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. कारण पावसात भिजणं हे आता केवळ रोमँटिक सिनेमापुरतं नाही राहिलं- ते एक स्टाइल स्टेटमेंट झालं आहे.
पावसाळी रंगसंगतीत तरुणींचा कल असतो :
पिंक विथ पोल्का डॉट्स
सनी यलो विथ ब्लू एजिंग
सॉफ्ट ग्रे विथ व्हाइट लेस बॉर्डर
अ‍ॅब्स्ट्रॅक्ट डिझाइन्स
आणि अर्थातच-निऑन कलर्स!
ही छत्री उघडताना एक वेगळाच आत्मविश्वास उफाळतो.
इन्स्टाग्रामवरची अम्रेला पोझ
आजकाल कॉलेज मुलींसाठी छत्री म्हणजे रिल पर्पज असते. अर्धी उघडलेली छत्री, हलकं भिजलेलं केसांचं मोकळं गुंजणं आणि चेहर्‍यावर छत्रीच्या नाजूक सावलीच्या अदा- ही सगळी गोष्ट एका क्लिकमध्ये सोशल मीडियावर अम्रेला पोझ (णालीशश्रश्रर झेीश) बनते.
त्या साध्याशा वस्तूच्या माध्यमातून कॉलेज लूकला मिळतो एक स्पार्कलिंग टच!
ड्रेससह छत्री मॅच करायचा नवा ट्रेंड
आजकाल छत्री ही केवळ पावसाळ्यात निघणारी गोष्ट राहिली नाही. ती बनली आहे, ओटीटी ड्रेससाठी स्टाइल अ‍ॅक्सेसरी. क्लास गॅदरिंग किंवा फोटोशूटसाठी प्रॉप. रंगपंचमीसारख्या इव्हेंटसाठी फंकी लूकचा भाग. पिंक कुर्तीवर बेबी पिंक छत्री किंवा वाइट टॉपवर ब्लॅक अँड व्हाइट स्ट्राइप छत्री- अशा मॅचिंग ट्रेंड्स कॉलेजमध्ये ट्रेंडी टॉकिंग पॉइंट बनतात.
टिप्स : छत्री खरेदी करताना काय लक्षात घ्याल?
फोल्डेबल आणि लाइटवेट : कॉलेज बॅगमध्ये सहज बसणारी आणि उघडायला सोपी.
स्ट्राँग फ्रेम : वार्‍यात उडणार नाही अशी मजबूत संरचना असलेली.
वॉटर रेसिस्टंट + यूव्ही प्रोटेक्शन : फक्त पाऊसच नव्हे, उन्हातही स्टाइल कायम!
पर्सनलिटीशी मॅच होणारा रंग/प्रिंट : छत्री निवडताना ती तुमचं मन दाखवते, हे लक्षात ठेवा.
ब्रँडेड की लोकल?
आज मार्केटमध्ये घ्याव्या इतक्या डिझाइन्स आहेत. ट्रेंडी लोकल ब्रँड्सपासून ते ऑनलाइन एक्सक्लुझिव्हपर्यंत. काही तरुणींना लोकल रोडसाइडवर मिळणार्‍या फंकी प्रिंटेड छत्र्या खूप आवडतात. कारण त्या अ‍ॅफोर्डेबल आणि हाय-फॅशन असतात. तर काही मुली मात्र ठरवून कच्, चळपळीे या स्टाइल ब्रँड्सची छत्री घेतात. अधिक टिकाऊ आणि इन्स्टाफ्रेंडली असते ना! ठरळप र्लीीं चरज्ञश ळीं ऋरीहळेप! पाऊस आला की, केस विस्कटतात, मेकअप वाहतो, पण छत्री मात्र कधीही तुमचं स्टाइल कव्हरिंग करत राहते. तुमची उमदा अदा, स्वतःची ओळख आणि स्टायलिश अस्सलपणा- हे सगळं तुमच्या छत्रीच्या रंगात मिसळलेलं असतं. छत्री वापरणं म्हणजे केवळ भीती नाही, तर नवा फॅशन फॉर्म!
निष्कर्ष : छत्री- कॉलेज फॅशनची नवी हिरोइन.
छत्री ही आता भिजण्यापासून वाचवणारी वस्तू नाही, ती एक अ‍ॅक्सेसरी आहे, जी तुमच्या स्टाइलमध्ये भर घालते. कॉलेजमध्ये तुमच्या चालण्यात, लूकमध्ये आणि आत्मविश्वासात छत्रीचा तडका जाणवतो- अगदी स्टायलिश वार्‍याच्या झुळुकेसारखा!
तर मग, या पावसाळ्यात छत्री उघडा, पण स्टाइल आणि आत्मविश्वासासोबत!

 

Editorial Team

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

29 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

6 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago