नाशिक

रस्ता खोदकामामुळे भूमिगत केबल खंडित; वीजपुरवठा बंद

नाशिकरोडला 5 तास नागरिकांचे हाल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मुक्तीधाम विद्युत उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी महत्त्वाची 33 केव्ही भूमिगत केबल जेलरोडवरील पाण्याच्या टाकी परिसरात स्थानिक रस्त्याचे काम चालू असताना जेसीबीद्वारे खंडित झाली. त्यामुळे देवळाली कॅम्प आणि मुक्तीधाम उपकेंद्र बंद होऊन या परिसरातील वीज पुरवठा काल दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत खंडित झाला होता. सदर भूमिगत केबलची दुरुस्ती होईपर्यंत इतर विद्युत उपकेंद्रातून पर्यायी वीज पुरवठा घेऊन तात्पुरता स्वरूपात वीज सुरू केला
ठेकेदार व संबंधित कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे भर उन्हात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सिंहस्थानिमित्त नाशिकरोड, जेलरोड परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत हे कामे होत असताना रस्त्याचे खोदकाम केले जाते या खोदकामात भूमिगत विजेच्या वायरचे नुकसान होत आहे. रविवारी दुपारी खोदकाम करीत असताना जेलरोड-इंगळे नगर पाण्याच्या टाकीजवळ पंचक सब स्टेशनहून देवळालीगांव येथील उपकेंद्रांवर जाणारी विद्युत वाहिनी पंक्चर झाली त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. यावेळी बिटको, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुक्तीधाम अनुराधा चौक, आर्टिलरी सेंटर रोड, आनंद नगर, दत्तमंदिर रोड देवळाली गाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता.
दुपारी सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी महावितरण व मनपा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र ’तांत्रिक कारणे’ पुढे करत प्रतिसाद देण्यात टाळाटाळ झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. सध्या उन्हाळा असल्याने उकाड्यात वीज नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले.

Underground cable severed due to road excavation; power supply cut off

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

12 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

31 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

38 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

47 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

55 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago