सिडको : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकासह त्याच्या आई-वडिलांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची 17 वर्षे 8 महिने वयाची मुलगी ही दुगाव येथील एका आंतरराष्ट्रीय अकॅडमीत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. सन 2025 मध्ये अकॅडमीतील वार्षिक कार्यक्रमादरम्यान तिची ओळख हर्षिल बावा याच्याशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. संबंधित युवक मुलीला फिरण्यासाठी व पार्टीसाठी घेऊन जात असे. यासाठी तो एमएच 15- जीएल 6557 क्रमांकाची कार वापरत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, फिर्यादींच्या वडिलांना कर्करोग झाल्याने वारंवार उपचारासाठी रुग्णालयात जात असत. त्यावेळी मुलगी घरी एकटी राहत होती. या काळात युवकाने मुलीसोबत घरात तसेच कारमध्ये वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घरातील पैसेही पार्टी व नशेसाठी वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि. 30 एप्रिल रोजी संबंधित मुलगी घरातून निघून जाण्याच्या तयारीत होती. यावेळी तिने हर्षिलसोबतच विवाह करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत
आहेत.
A case of rape and sexual assault against a minor girl has been registered.
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…