नाशिक

त्र्यंबकेश्वर येथे अनोळखी महिलेचा दगडाने ठेचून खून

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे. सुमारे 40 ते 45 वयोगटातील ग्रामीण भागातील पेहराव असलेल्या महिलेचा मृतदेह येथील हॉटेल संदीपच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीलगत पडलेला होता.
मृत महिलेचा दगडाने ठेचून मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. अनोळखी असलेली महिला भंगार अथवा कचरा वेचणारी असावी असे दिसते. बुधवारी सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले व त्यांनी त्र्यंबक पोलिसांत कळवले. त्यानंतर तातडीने पोलीस पथक दाखल झाले. मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तेथील अहवाल आल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडण्यास मदत होईल. त्र्यंबक पोलिसांत अज्ञाताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या जवळच शासकीय विश्रामगृह आहे. तसेच काही अंतरावर वाहे गुरू लंगर आहे. तेथे दोन वेळेला जेवण देण्यात येते. त्र्यंबकेश्वर परिसरातील निराधार, भिक्षेकरी या भागात जेवणासाठी येत असतात व जवळपास वास्तव्य करतात. यापूर्वी एका साधूच्या वेशातील भिक्षेकर्‍याची हत्या घडली होती. त्यातील संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडले होते. या घटनेत एका महिलेचा निर्घृणपणे खून झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Unidentified woman stoned to death in Trimbakeshwar
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago