नाशिक

त्र्यंबकला देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकताच नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, निकालानंतर असते तशी तणावपूर्ण परिस्थिती असताना गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा इसम आढळून आल्याने दहशत पसरली आहे.
दि. 23 रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार असे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेगलवाडी फाटा येथे रोडवर एक इसम अवैधरीत्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली.
त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी फाटा येथे सापळा लावून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले. सदर इसमास विचारपूस केली असता त्याचे नाव देवराम संतू सोनवणे (वय 46 वर्षे, रा. तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) व एक जिवंत काडतूस, एक मोटारसायकल, मोबाइल फोन असा मुद्देमाल मिळून आला. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून, त्यांच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह मपोकाक 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, शांताराम नाठे, हवालदार जालिंदर खराटे, सुशांत मरकड, भाऊ झाडे, शंकर साबळे, सुनील बर्वे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. त्र्यंबक शहरात अवैध पिस्तूल प्रकरणाने दहशत पसरली आहे.
पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच प्रतिबंध करावा, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

Man arrested for carrying country-made pistol, live cartridge in Trimbak
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

17 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

17 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

17 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

17 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

17 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago