नाशिक

सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट

गहू, हरभरा व कांदा पिकाला मोठा फटका

सिन्नर/लासलगाव : प्रतिनिधी
तालुक्यात मंगळवारी (दि.18) दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अल्पकाळ गारपीटही झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.
सिन्नर शहरासह परिसरात दुपारी चारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकाडा वाढल्याने वातावरण दमट झाले होते. त्यानंतर अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पाच ते सात मिनिटे गाराही पडल्या. दरम्यान, सिन्नर शहरातील सरदवाडी उपनगरात झालेल्या पावसामुळे सरदवाडी रस्त्यावर वाजे लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. गुडघाभर पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही भागातील गल्ल्यांमधूनही पाणी वाहत होते.
सिन्नर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या. मोह, वडझिरे, नायगाव, जायगाव, देशवंडी, चिंचोली, माळेगाव, दातली तसेच परिसरातील काही गावांमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत पावसाने हजेरी लावली. जायगाव घाटाच्या पायथ्याशी तसेच मोह शिवारात काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती आहे. नायगाव पट्ट्यात विजांचा कडकडाट आणि वार्‍यासह पावसाची नोंद झाली. साडेतीन ते चार या वेळेत पावसाचा जोर अधिक असल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा तसेच कांदा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः नायगाव खोर्‍यातील कांदा, गहू तसेच कांदा बियाणे प्लॉटला या पावसाचा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लासलगावला अवकाळी
पावसाची हजेरी, गारपीट
लासलगाव व परिसरातील गावात बुधवारी (दि. 18)संध्याकाळी जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली काही ठिकाणी गारपीट देखील झाली. लासलगावसह परिसरातील गावात बुधवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.अवकाळी आणि गारपिटीचा द्राक्ष कांदा, गहू आणि अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुमारे अर्धा तास बरसलेल्या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले. अचानक आलेल्या पावसानं गुढीपाढवा सणाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.पावसामुळं हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. परंतु आता शेतकर्‍यांना शेतातील पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे.

Unseasonal rains and hailstorm in Sinnar taluka

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

7 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

7 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

7 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

7 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

7 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

8 hours ago