लाळ्या-खुरकत रोगावरील लसीकरण मोहीम; पशुपालकांना जनजागृती

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील सांगवी येथे मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव (नाशिक) यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने जनावरांच्या लाळ्या-खुरकत (एफएमडी) रोगावरील लसीकरण मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी अहेर सर,
समन्वयक सातपुते मॅडम, दरेकर मॅडम तसेच विभागप्रमुख प्रा. पंकजसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बी.एस्सी. (कृषी)चे विद्यार्थी मयूर मेढे, कृष्ण म्हसे, आदित्य ओव्हाळ, शुभम पालदे व अजित पाटील यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने सांगवी गावातील जनावरांचे लाळ्या-खुरकत (एफएमडी) रोगावरील लसीकरण केले. तसेच पशुपालकांना रोगाची लक्षणे, प्रसाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लाळ्या-खुरकत हा गुरे, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून, वेळेवर लसीकरण केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, जनावरांचे आरोग्य चांगले राहते, दूध उत्पादन वाढण्यास मदत होते आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय, शासनाच्या लसीकरण मोहिमेत नियमित सहभागी होऊन पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातून कृषी विद्यार्थी पशुपालकांशी प्रत्यक्ष संवाद साधत पशुसंवर्धनातील आधुनिक तंत्रज्ञान, संतुलित पशुखाद्य व्यवस्थापन, गोठा स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपायांविषयी जनजागृती करत असून, यामुळे पशुसंवर्धनाला बळ मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Vaccination drive against Foot-and-Mouth Disease; public awareness for livestock owners.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *