आमदार माणिकराव कोकाटे यांचे वडांगळीकरांना आश्वासन
सिन्नर : प्रतिनिधी
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी वडांगळी येथील आठवडी बाजाराचे आधुनिकीकरण करून ते ‘लोकनेते अजितदादा पवार प्रेरणास्थळ’ म्हणून विकसित केले जाईल, असे आश्वासन आमदार माणिकराव कोकाटे यांनी वडांगळीकरांना दिले.
राज्याच्या विकासात स्व. अजितदादांचे योगदान मोठे आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला, युवक आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने त्यांनी काम केले. शिवाय, सिन्नर तालुक्याला प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम दादांनी करून दाखवले. सिन्नर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम दादांनी केले. त्यांच्या कार्याचा उजाळा पुढील पिढ्यांनाही व्हावा, या हेतूने तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासक नानासाहेब खुळे, सदस्य राहुल खुळे, दत्तात्रय खुळे, शंकर गडाख आदींनी आमदार माणिकराव कोकाटे यांना वडांगळी येथील आठवडे बाजाराचे आधुनिकीकरण करत त्याचे ‘लोकनेते अजितदादा पवार आठवडी बाजार प्रेरणास्थळा’त रूपांतर करण्याची मागणी निवेदन देत केली. बाजार, बँक, शिक्षण, आरोग्य आदी महत्त्वाच्या गरजा वडांगळीतच पूर्ण होत असल्याने वडांगळी हे परिसरातील 15 गावांचे मुख्य केंद्र बनले आहे. येथे दररोज भाजीपाला बाजार तसेच आठवडी बाजार भरतो. या बाजाराशी परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने जोडलेले आहेत. वडांगळी हे तीर्थक्षेत्र असल्याने देशभरातून बंजारा बांधव व लिंगायत समाजाचे बांधवही या ठिकाणी वर्षभर मोठ्या संख्येने येत असतात. हे सर्व प्रेरणास्थळ बघून दादांच्या आठवणी आपल्यासोबत घेऊन जातील. शिवाय, या बाजाराचा शेतकरी, ग्राहक व व्यापारी यांनाही मोठा फायदा होईल, अशी भावना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी व्यक्त केली. प्रस्तावित बाजारात सुरुवातीलाच स्व. अजितदादांचा पुतळा, प्रशस्त व्यापारी शेड, बाजार ओटे, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, स्वच्छतागृहे, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, एलईडी प्रकाशयोजना, सीसीटीव्ही सुरक्षाव्यवस्था, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य आधुनिक सुविधा निर्माण केल्या
जाणार आहेत.
स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांना साजेशा पद्धतीने हे ठिकाण बनविले जाईल. त्यामुळे ते केवळ बाजार केंद्र न राहता शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगाचे प्रेरणास्थळ बनविले जाणार आहे. ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन त्याचा सविस्तर आराखडा बनविण्यास सांगितले असून, त्यासाठी शासनस्तरावरून भरीव असा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे बाजाराचे आधुनिकीकरण झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील.
-आमदार माणिकराव कोकाटे
Vadangali’s weekly market to become ‘Loknete Ajitdada Pawar Inspiration Centre’
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…