Categories: नाशिक

रिंगरोड सुनावणीत केवळ अर्ज स्वीकारले : शेतकर्‍यांचा आरोप

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

नाशिक :
प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी दाखल झालेल्या हरकतींवरील सुनावणीला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्ष सुनावणी न घेता केवळ हरकतींचे अर्ज स्वीकारण्यात आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी प्रशासनावर सुनावणी केवळ औपचारिकता ठरली, असा आरोप केला. यावेळी जिरायती जमिनींना बागायती दराने मोबदला, पोटहिस्सा मोजणी आणि
सर्वोत्तम सुधारित दराने भरपाई देण्याची प्रमुख मागणी शेतकर्‍यांनी केली.

सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेसाठी 65.5 किलोमीटरचा बाह्य रिंगरोड प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे 366 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प तीन तालुक्यांतील अनेक गावांमधून जाणार असल्याने सुपीक शेती, घरे आणि व्यावसायिक मालमत्ता बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी भूसंपादन प्रक्रियेविरोधात मोठ्या प्रमाणावर हरकती, सूचना आणि फेरविचार अर्ज दाखल केले
आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत गावनिहाय सुनावणीचे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी बारा गावांतील शेतकर्‍यांना बोलावण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष चर्चेद्वारे हरकतींची सुनावणी न करता केवळ अर्ज स्वीकारण्यात आल्याचा आरोप उपस्थित शेतकर्‍यांनी केला. कोणत्याही मुद्यावर स्पष्ट निर्णय न देता लेखी स्वरूपात म्हणणे नोंदवून घेण्यात आले, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकर्‍यांचा वाढता रोष लक्षात घेता प्रशासनाने हरकतींवरील निर्णय टपालाद्वारे संबंधितांना कळविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

आंदोलकांना प्रवेशद्वारावर रोखले
उपोषणस्थळी असलेल्या काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. सर्व शेतकर्‍यांच्या मागण्या समान असल्याने प्रशासनाने सर्वांची एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रिंगरोड सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह दंगल नियंत्रण पथकाची तुकडी तैनात करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असून, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

 

 

 

Only applications accepted at Ring Road hearing: Farmers allege

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago