नाशिक

‘वसाका’ची सुरक्षा कोलमडली

अतिथीगृहातील सामानाची चोरी; सुरक्षा यंत्रणा वार्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी
कसमादेसह उत्तर महाराष्ट्राचे वैभव असलेला वसाका सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. पंधरा वर्षांपूर्वी या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. सध्या ‘वसाका’ची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
दीड- दोन वर्षांपूर्वी कारखान्यासह वीज प्रकल्पाच्या महाकाय ट्रान्स्फॉर्मरमधून हजारो लिटर ऑइल चोरी करून गुन्हेगार पसार झाले. चोरीचे धागेदोरे कळवणपर्यंत गेले होते, तरी पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही. मधल्या काळात मुख्य कारखान्यात प्रवेश करून पश्चिम बाजूला असलेल्या दगडी भिंतीला मोठं भगदाड पाडून आत प्रवेश केला. लाखो रुपये किमतीचा इलेक्ट्रिक मोटारी, पितळी तसेच लोखंडी व्हॉल्व्हसह ट्रॅक्टर ट्रॉली गिरणा नदीकिनारी आढळून आले होते. कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले किमती सामान कारखान्यात होते. दुर्दैवाने दोन वर्षांनंतर तेथे काय शिल्लक राहिले, हे सांगणे कठीण आहे. सध्या दोन तीन नर-मादी बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे काहीकाळ चोर्‍या आटोक्यात आल्या होत्या. दोन-तीन दिवसांपूर्वीही कारखान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या वातानुकूलित अथितीगृहामागे असलेल्या शेतकरी निवासातील खोल्यांची कुलपे तोडून तेथील किमती फर्निचर व गाद्या व इतर सामान लुटून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कारखान्याच्या रोजंदारीवर कामावर असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांच्या कानावर हा प्रकार टाकला. त्यांनी तत्काळ कारखान्याच्या कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी, विशाल निकम, दिनेश ठाकरे, युनियन सदस्य शशिकांत पवार, दीपक पवार, रणधीर पगार उपस्थित होते.

Gavkari Admin

Recent Posts

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

4 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

4 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

4 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

1 day ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

1 day ago

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…

1 day ago