संपादकीय

स्त्रियांचे मानाचे स्थान अधोरेखित करणारा दिवस वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत भावपूर्ण आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. हा सण केवळ धार्मिक विधी नसून, वैवाहिक जीवनातील प्रेम, विश्वास, निष्ठा आणि एकमेकांवरील समर्पण यांचे सुंदर प्रतीक आहे.
यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा होतो आहे.वटपौर्णिमा हा हिंदू विवाहित महिलांचा एक प्रमुख सण आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाते. यामध्ये वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्या जातात. या व्रताचा उगम सावित्री आणि सत्यवानाच्या कथेवरून झाल्याचे सांगितले जाते. सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या आणि दृढनिश्चयाच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. वडाचे झाड दीर्घायुष्य आणि अखंड समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणून या वृक्षाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा…सौभाग्य… पती-पत्नीतील प्रेम… निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. या दिवशी शुभमुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
वैवाहिक नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचे महत्त्व जपणे होय. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचे कुटुंब आणि समाजातील स्थान हे मानाचे आणि सशक्त असे आहे. तिला जगतजननी म्हटले आहे आणि तिलाच दुष्टांचा संहार करणारी काली माताही म्हटले आहे. हे लक्षात घेऊन आजच्या काळातही महिलांनी आपले हे सामर्थ्य आणि संस्कार टिकवून सामाजिक संतुलन राखण्यास तत्पर असले पाहिजे. – राजू जाधव

Vat Purnima: A day that highlights the honored status of women.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago