आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी व ग्राहकांची तारांबळ
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथे रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात व्यावसायिक आणि शेतकरी, ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.
22 जूननंतर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक दमदार पावसाने एन्ट्री केली. येथील रविवारी मुख्य आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेकडो शेतकरी व किरकोळ विक्रेते आपला माल विकण्यासाठी बाजारात आले होते. मात्र, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसापासून बचावासाठी बाजारात पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकरी आणि व्यापार्यांना आडोसा शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. भाजीपाला, फळे आणि इतर अन्नधान्य उघड्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर भिजले. अनेक शेतकर्यांचा कोथिंबीर, मेथी, टोमॅटो यांसारखा नाशवंत माल पाण्यात भिजला तसेच कपडे, कटलरी आणि इतर वस्तूंची दुकाने थाटलेल्या छोट्या व्यावसायिकांना आपला माल गोळा करायला वेळच मिळाला नाही. ताडपत्री बांधेपर्यंत बहुतांश माल ओला झाल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही या पावसामुळे धावपळ झाली.
Heavy rainfall in Lasalgaon.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…