नाशिक

उंबरदे येथील स्मशानभूमीच्या दुर्दशेने ग्रामस्थ आक्रमक

ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा; ‘विकासाच्या केवळ गप्पा नकोत‘

सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील उंबरदे गावातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. मोडकळीस आलेले पत्र्याचे छप्पर, उघडी लोखंडी संरचना आणि परिसरात प्रचंड वाढलेले गवत व झुडपे यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात छप्पराची दुरवस्था अधिक त्रासदायक ठरत असून, अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना पावसात उभे राहण्याची वेळ येत आहे.
गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या चर्चा होत असताना, मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी असलेल्या मूलभूत सुविधेची साधी दुरुस्तीही होत नसेल तर नेमका विकास कुठे झाला? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. स्मशानभूमीची देखभाल करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना, सरपंचांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्मशानभूमीच्या दुरवस्थेची तातडीने पाहणी करून नवीन छप्पर, स्वच्छता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. “विकासाच्या गप्पा नकोत, आधी स्मशानभूमीची दुरवस्था दूर करा,” अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. उंबरदे गावातील युवा कार्यकर्ते श्रीराम मोरे, सोमनाथ मोरे, विलास गायकवाड, हेमंत गवळी, उत्तम गवळी, कांतीलाल गावित, वसंत गवळी, कांतीलाल कामडी आणि गणेश गवळी आदींनी याप्रकरणी लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी केली आहे.

आमच्या उंबरदे गावची स्मशानभूमीची अवस्था खूपच बिकट झालेली असताना, वारंवार सरपंचांना सांगून व निवेदन देऊनसुद्धा मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. येत्या हप्ताभरात ग्रामसेवक व सरपंच यांनी कमीत कमी दुरुस्ती तरी करावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असेल.
-दिनकर गवळी, युवा सामाजिक कार्यकर्ता, उंबरदे

सरपंच आणि ग्रामसेवकांनी एका आठवड्यात दुरुस्ती केली नाही तर ग्रामपंचायत तर सोडाच, पण साधे गावातसुद्धा फिरकू देणार नाही, असा संतप्त इशारा मी गावकर्‍यांतर्फे देत आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.
– दिनेश मिसाळ, ग्रामस्थ, उंबरदे

Villagers are aggressive over the plight of the cemetery in Umbarde

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

श्रद्धा ते अंधश्रद्धा

(भाग 1) प्रत्येक अंधश्रद्धेशी निगडित जनमानसातल्या पुरातन काळातल्या श्रद्धा निश्चितच आहेत... आई उवाच... मांजर आडवे…

13 hours ago

चार भिंतींचा निवारा

आजकाल प्रत्येक घरात संध्याकाळी एक दृश्य अगदी सर्रास पाहायला मिळतं-कामानिमित्त बाहेर गेलेली माणसं घरी परततात,…

13 hours ago

वंध्यत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून:

ताणतणाव,जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग प्रेग्नन्सी का होत नाही? फर्टिलिटी क्लिनिकमध्ये…

14 hours ago

एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंंड

पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक…

14 hours ago

लोकशाही आहे का?

भाग 2 विमानाचा पायलट निवडताना त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा निकष न लावता जो इच्छुक असेल…

14 hours ago

समान नागरी कायदा

भाजपाच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स (एनडीए) म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029…

14 hours ago