विधान परिषदेसाठी उद्या मतदान

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आज मतदारांना मार्गदर्शन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी (दि. 18) सतरा ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. खबरदारी म्हणून शिंदेसेना व भाजपचे नगरसेवक ठाण्याला रवाना झाले आहेत. दरम्यान आज, बुधवारी (दि. 17) महायुतीच्या सर्व नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संयुक्तरीत्या मार्गदर्शन करणार आहेत.
शिंदेसेना व भाजपचे नगरसेवक ठाण्याला रवाना झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक नाशिकमध्येच होते. त्यामुळे यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ठाण्याला जाणार आहेत.
नाशिक विधान परिषद निवडणूक प्रारंभापासून कमालीची चर्चेत राहिली. महाविकास आघाडीने उमेदवार न देतानाही अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते. विशेषत: दराडेंवर नाशिक शहरासह जिल्ह्यातील मतदारांच्या नाराजीचा फायदा गिते यांना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

महायुतीच्या संपूर्ण मतदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व नगरसेवकांना संयुक्तरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील.
– अजय बोरस्ते,
उपनेते, शिवसेना शिंदे गट

राष्ट्रवादीचे नगरसेवक आज जाणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक आज (बुधवार) सकाळी आपापल्या वाहनाने ठाण्याकडे कूच करणार आहेत. जिल्ह्यातील काही मतदार गेले असून, नाशिकमधील नगरसेवकही आज जाणार आहेत.
– रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस(अ.प. गट)

 

 

Voting for the Legislative Council tomorrow.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *