नाशिक

नंदिनी नदीपात्रात कालबाह्य औषधांचा खच

सिटी सेंटर मॉलजवळ प्रकार एफडीएकडे तक्रार

नाशिक : विशेष प्रतिनिधी
शहर स्वच्छतेचे व पर्यावरण संवर्धनाचे दावे केले जात असतानाच, नाशिक शहरातील नंदिनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेली औषधे आणि टॅब्लेट फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या महालक्ष्मी देवी मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडला असून, यामुळे नदीचे प्रदूषण तर वाढले आहेच, शिवाय परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
असा उघडकीस आला प्रकार
नेहमीप्रमाणे सकाळी नंदिनी नदी परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेले पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील यांच्या ही बाब लक्षात आली. नदीच्या किनारी आणि पात्रात औषधांच्या बाटल्या व टॅब्लेटचे मोठे साठे तरंगताना व साचलेले दिसले. त्यांनी तातडीने पुढाकार घेत हे औषधांचे साठे नदीपात्रातून बाहेर काढले.
फेकलेल्या औषधांच्या कचर्‍यामध्ये काही कागदपत्रे आणि पत्याचे पुरावे देखील आढळून आले आहेत. त्यामुळे ही औषधे कोणी फेकून दिली, याचा सुगावा लागणे सहज शक्य झाले आहे. निष्काळजीपणे औषधे नदीत टाकून जलप्रदूषण करणार्‍या असामाजिक तत्त्वांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली आहे. या घटनेची गंभीर दखल नाशिक विभागाचे सह-आयुक्त श्री. देशमुख यांनी घेतली असून, मिळालेल्या कागदपत्रांच्या व पत्यांच्या आधारे संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“नदीमध्ये अशा प्रकारे रसायने व कालबाह्य औषधे टाकणे अत्यंत धोकादायक आहे. औषधांसोबत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे एफडीए नक्कीच दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.“
– चंद्रकिशोर पाटील, (पर्यावरणप्रेमी)

Waste of expired medicines in Nandini river basin

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago