मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या गिरणा पंपिंग स्टेशनला लागलेल्या आगीमुळे शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. ही चौथी वेळ असून, वारंवार होणार्या पाणीपुरवठा खंडितमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरातील मुख्य जलवाहिनी
फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर हॉटेल मिलनजवळील पाइपलाइनमध्येही गळती निर्माण होऊन पुरवठा थांबवावा लागला होता. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याच्या तयारीत असतानाच गिरणा पंपिंग स्टेशनवरील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या घटनेमुळे सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुन्हा एकदा पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणार्या बिघाडामुळे पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
महापालिका प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, नागरिकांना नेमका पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मनपा गिरणा डॅम 33 केव्ही सबस्टेशनवरील तीन एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरच्या केबलमध्ये स्पार्किंग होऊन शुक्रवारी (दि.10) दुपारी 12:30 वाजता आग लागली. विद्युत अधीक्षक अभिजित पवार व त्यांच्या टीमने तत्परतेने फायर एक्स्टिंग्युशर, रेती व पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणत शेजारील स्टॅण्डबाय ट्रान्सफॉर्मर वाचवला. दोन्ही ट्रान्सफॉर्मरच्या केबल एकाच ओपन डक्टमधून गेल्याने त्या जळाल्या आहेत. यामुळे मोठे तांत्रिक नुकसान झाले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…