18 गावे आणि 37 वाड्यांना टंचाईची झळ
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे. मालेगाव व येवला तालुक्यांतील 18 गावे व 37 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 21 ऑक्टोबरच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, या भागातील 37 हजार 714 नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी एकूण 15 टँकर सुरू आहे. त्याद्वारे दररोज 30 फेर्यांतून पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सहा गावे आणि 14 वाड्यांना मिळून 20 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी सहा टँकर कार्यरत आहे. दररोज 12 फेर्या होत आहेत. या भागातील 13 हजार 140 नागरिकांना टँकरच्या पाण्याचा लाभ मिळत आहे. येवला तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक असून, 12 गावे आणि 23 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येथे 35 ठिकाणी पाणीपुरवठ्याची गरज आहे. नऊ टँकर रोज 18 फेर्या करीत आहेत. या माध्यमातून 24 हजार 574 नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
टँकरफेर्या वाढण्याची शक्यता
दुष्काळी परिस्थितीच्या पाश्वर्र्भूमीवर पुढील आठवड्यापासून टँकर फेर्यांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.
Water supply in the district provided through 30 tanker trips
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…