नाशिक

नळजोडण्यांना वीजपंप लावून पाण्याची चोरी

महापालिकेला दंडात्मक कारवाईचा विसर

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अनेक नळकनेक्शनधारक नळांना थेट वीजपंप लावत असल्याने त्यांच्याविरोधात महापालिकेने कारवाई करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान अधिकृत नळजोडण्यांना विद्युत मोटर लावली जात असल्याने शहरातल्या अनेक भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. याप्रकराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुुरवठा विभागाने एप्रिलमध्ये शहरभरात विद्युत मोटर लावणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, पाणीपुरवठा विभागाने दिलेला इशारा हवेतच विरला आहे. कारण दोन महिने उलटूनही शहरातील कोणत्याच विभागात अद्याप या मोहिमेला मुहूर्तच लागला नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे मात्र आजही शहरातल्या विविध भागांतील नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे.
शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या दिवसांपासून वारंवार शटडाउन घेतले जात असल्याने त्यास नागरिक वैतागले आहेत. दरम्यान, पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने प्रशासन पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने विभागीय अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली दि. 13 एप्रिलपासून धडक मोहीम हाती घेणार होती. परंतु दोन महिने उलटूनही मोहिमेला मुहूर्तच लागला नसल्याचे चित्र आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नळांना वीजपंप लावणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार होती. घरोघरी जाऊन नळांची तपासणी होणार होती. याशिवाय नळजोडणीत जलमापक नसल्यास किंवा ते नादुरुस्त, बंद आढळल्यास नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईी करण्यात येऊन पाणीबिल आकारणी करण्यात येणार होती. वीजपंप नळजोडणी केलेली आढळल्यास पंप कायमस्वरूपी जप्त करून पाचशे रुपये दंड आकारला जाणार होता. सेच पाण्याचा अपव्यय केल्यास व पाणी वाया घालवल्यास शंभर रुपये दंड आकारण्यात येईल. नळजोडणीधारकावर दंडात्मक कार्यवाहीसाठी मीटर रीडर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने घोषणा करून सोपस्कर करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नसल्याचे दिसते.

पोलिसांची मिळणार होती मदत
ही मोहीम राबविण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत संबंधित विभागाच्या उपअभियंत्यांनी त्यांच्या अखत्यारितील एक कनिष्ठ अभियंता, मिस्त्री, मुकादम यांची प्रभागनिहाय नेमणूक केली जाणार होती. त्यात एक फिटर, पाच प्लंबर व कर्मचार्‍यांना पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाची मदत दिली जाणार होती. यानुसार प्रत्येक विभागाला दोन पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार होते. परंतु प्रशासनाने यासंदर्भातील कार्यवाहीसाठी दोन महिन्यांत कुठलीही हालचाल केली नसल्याने वीजपंप लावणार्‍यांचे फावते आहे.

Water theft by installing electric pumps on water connections.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago