साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक

मेष : जोरदार आगेकूच

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती. गुरू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कुपथ्य टाळा.

वृषभ : नफा वाढेल

या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, केतू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणी सतावतील. येणे पैसे वसूल होणार नाहीत. नोकरदारांना चुका टाळणे आवश्यक ठरेल. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. कोर्ट, कचेरीची शासकीय कामास विलंब होईल.

मिथुन : आर्थिक सुबत्ता

या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल. येणे पैसे वसूल होतील. धनचिंतांना उतार पडेल. खर्च वाढेल. नोकरदारांवर कामाचा बोजा पडेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.

कर्क : आडाखे चुकतील

या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना वादविवाद संघर्षाला तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. मानसिक अस्वास्थ्य लाभेल. संयम ठेवा. आरोग्यप्रश्नांची काळजी घ्या.

सिंह : मंगलवार्ता कळतील

या सप्ताहात मंगळ, बुध अनुकूल आहेत. रवी, गुरू, शुक्र, राहू, केतू शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात धनचिंता सतावतील. खर्च मोठ्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे पैसे वसूल होतील. शेअरमध्ये गुंतवणूक टाळा. मंगलवार्ता कळतील. अध्यात्मात मन रमेल.

कन्या : प्रगती होईल

या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांची प्रगती होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. प्रवास टाळा, वाहन सावधपणे चालवा, प्रकृतीची काळजी घ्या.

तूळ : आनंदवार्ता कळतील

या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. मनावर संयम ठेवा. प्रकृती जपा.

वृश्चिक : यशप्राप्ती होईल

या सप्ताहात गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल.

धनु : इच्छा पूर्ण होतील

या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू, शुक्र, शनि, रवी प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. पैशांची आवक वाढेल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. शासकीय, कोर्ट, कचेरीची कामे लांबणीवर टाकणे लाभदायक ठरेल. विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील.

मकर : विवाह जमतील

या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदारांना पर्यटनाचे योग प्राप्त होतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. अविवाहितांचे विवाह जमतील. अनुरूप वधूवर मिळतील. प्रकृती जपा.

कुंभ : अडचणी दूर होतील

या सप्ताहात मंगळ, बुध अनुकूल आहेत. शनिची साडेसाती रवी, गुरू, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. दिलासा मिळेल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. विरोधकांच्या कारवाया अडचणीत आणतील. मानसिक अस्वास्थ्य लाभेल. प्रकृतीची काळजी घ्या.

मीन : पदोन्नती मिळेल

या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

Weekly Horoscope

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *