साप्ताहिक राशिभविष्य

दि. 12 ते 18 जुलै 2026
पुरुषोत्तम नाईक

मेष : धनचिंता दूर होतील
या सप्ताहात रवीचे दि. 16 जुलैला मिथुन राशीतून कर्क राशीत राश्यांतर होत आहे. मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती गुरू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता दूर होतील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल. प्रकृती जपा.
वृषभ : आर्थिक प्रश्न सुटतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. येणेे पैसे वसूल होतील. नोकरदारांच्या अडचणी कमी होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आर्थिक प्रश्न सुटतील. मनावर संयम ठेवा. वाद टाळा, प्रकृती सांभाळा.
मिथुन : आर्थिक समृद्धी
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी दि. 16 पासून अनुकूल होईल. मंगळ प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. येणे पैसे वसूल होतील. खर्च वाढतील. या सप्ताहात प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. नोकरदारांचे काम प्रगतिपथावर राहील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय अचूक ठरतील. प्रकृती जपा.
कर्क : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात मंगळ, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता राहील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे चुकतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : पैसे वसूल होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी दि. 15 जुलैपर्यंत अनुकूल आहे. गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात दिरंगाई होईल. नोकरदारांचे संघर्ष होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे पैसे वसूल होतील. आरोग्य प्रश्नांची नीट काळजी घेणे आवश्यक ठरेल. कुपथ्य टाळा.
कन्या : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. दि. 16 जुलैपासून अनुकूल होईल. शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदारांना अडचणीतून मार्ग निघतील. व्यापारी, व्यावसायिकांनी विचारपूर्वक पावले उचलावीत. आरोग्य चांगले राहील.
तूळ : गणिते जुळतील
या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी दि.15 जुलैपर्यंत अनुकूल आहे. गुरू संमिश्र आहे. शनि, मंगळ प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांची गणिते जुळतील. प्रकृती जपा.
वृश्चिक : कामे मार्गी लागतील
या सप्ताहात मंगळ, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी दि. 16 पासून अनुकूल होईल. बुध, राहू, केतू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. नोकरदारांनी कुणावर विसंबून कामे करू नयेत. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. प्रकृती जपा.
धनु : कामास विलंब होईल
या सप्ताहात बुध, राहू, केतू, शुक्र अनुकूल आहेत. रवी, गुरू, मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यापारी, व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल. प्रकृती सांभाळा.
मकर : अनुकूलता मिळेल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शनि अनुकूल आहेत. रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक ओढाताण होईल. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांची कामे विलंबाने होतील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य प्रश्नांची काळजी घ्या. कुपथ्य टाळा. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात अनुकूलता प्राप्त होईल.
कुंभ : समीकरणे जुळतील
या सप्ताहात बुध, शुक्र अनुकूल आहेत. रवी दि. 15 पर्यंत अनुकूल राहील. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता राहील. नोकरदारांना संघर्षाला तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. आरोग्य जपा.
मीन : मानसिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, शुक्र, रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीतून मार्ग काढावे लागतील. मानसिक दिलासा मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *