दि. 9 ते 15 ऑगस्ट 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : अडचणी सतावतील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, गुरू, शुक्र प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. धनचिंता दूर होतील. नोकरदारव व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात विलंब होईल. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात. वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. शेअरमध्ये लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाऊबंदीकीतल वाद मिटण्याची शक्यता. प्रकृती जपा.
मिथुन : कामे पूर्ण होतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती अपेक्षेपेक्षा चांगली राहील. पैशांचे नवे स्त्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदारांची प्रगती होईल. अडलेली कामे पूर्ण होतील. व्यापारी, व्यावसायिकांना धनलाभ होईल. मनावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : प्रवास टाळा
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. मानसिक अस्वस्थ राहील. मन सैरभैर होईल. नोकरदारांना संकटाला तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. आरोग्यप्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात मंगळ, शुक्र अनुकूल आहेत. रवी, बुध, गुरू, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. आर्थिक दिलासा मिळेल. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. खर्च मोठ्या प्रमारात वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांची समिकरणे बिघडतील. प्रकृती जपा.
कन्या ; नफा वाढेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी कामात कुचराई केल्याने वरिष्ठांचे गैरसमज निर्माण होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. मन उत्साहीराहील. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र ओ.रवी, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांवर कामाचे दडपण राहील. व्यापारी, व्यावसायिकांची धावपळ होईल. मंगलवार्ता कळतील. प्रकृती जपा.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. शेअरमध्ये लाभ होतील. अडकलेले पैसे वसूल होतील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा. प्रकृतीची काळजी घ्या.
धनु : आनंदवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, बुध, गुरू, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना आनंदवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांना अडचणी सतावतील. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा. आरोग्याप्रश्नांकडे जातीने लक्ष द्या.
मकर : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक विवंचना त्रस्त करतील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना सुखवार्ता कळतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ : विरोधकांवर लक्ष ठेवा
या सप्ताहात मंगळ, बुध अनुकूल आहेत. गुरू संमिन आहे. शनिची साडेसाती, रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार वर्गाच्या अडचणी दूर होतील. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून निर्णय घेऊ नये. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नये. प्रकृती जपा.
मीन : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात रवी, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, मंगळ, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. मानसिक अस्वास्थ्य राहील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…