दि. 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026
मेष : तब्येतीची काळजी घ्या
या आठवड्यात व्यावसायिकदृष्ट्या फायदा होण्याचे योग आहेत काही गोष्टीत परिस्थिती जैसे थे राहण्याची शक्यता असून, तुम्ही तुमच्या कृतींबाबत अधिक सक्रिय आणि ठाम राहिलात तर ही परिस्थिती तुमच्या फायद्याची होवू शकते. या आठवड्यात नवीन गुंतवणूक करणे टाळा, कारण त्यातून निराशा होईल. तब्येतीची काळजी घ्या.
वृषभ : आर्थिक लाभ
या आठवड्यात आर्थिक प्रगतीला पुन्हा वेग येणार आहे. नवीन गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या नवीन प्रोजेक्ट जास्त काम करून घेणार आहेत पण तुम्ही घाबरू नका, मेहनतीचे फळ नक्की मिळेल. या आठवड्यात प्रेमाच्या बाबतीत वातावरण सुखद असेल तुम्ही एकमेकांना चांगला वेळ देणार आहात. हा आठवडा जास्त मेहनतीचा आणि नियोजनाचा आहे.
मिथुन : सकारात्मक राहा
या आठवड्यात घर किंवा कुटुंब तुमच्यासाठी मोठा आधार असेल. घरात जास्त वेळ देणार आहात त्यामुळे मानसिक समाधान वाढेल. गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत नाते मधूर होईल. व्यावसायिक आणि आर्थिक जीवनाशी संबंधित निर्णय घेताना सावध राहा. आठवड्याचा शेवट मात्र सकारात्मक असेल.कक
कर्क : आर्थिक लाभ होतील
या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारणार आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी कामाच्या बाबतीत जी आर्थिक जोखीम घेतली होती ती यशस्वी होणार आहे. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने वळतील आणि विविध मार्गांनी आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत दिलेली आश्वासने पूर्ण करा तरच नाते अधिक मजबूत होईल.
सिंह : स्वप्ने पूर्ण होतील
या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी थोडी जोखीम घ्यावी लागेल पण परिणाम चांगले मिळतील. व्यावसायिक क्षेत्रात बदल करण्यासाठी वेळ योग्य नाही. या आठवड्यात व्यावसायिक प्रवास टाळणेउत्तम आहे. पण खासगी कारणासाठी तुम्ही प्रवास करू शकता तो सकारात्मक राहतील. तब्येतीची काळजी घ्या.
कन्या : योजना सफल होतील
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वातावरण ठिक असेल. व्यावसायिकदृष्ट्या तुमचे काही प्रोजेक्ट सुरू होणार नाहीत, पण जे प्रोजेक्ट सुरू आहेत त्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. भविष्यातील गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले तर सुख समाधान मिळू शकते. आर्थिक लाभाच्या दृष्टीने वेळ सुखद आणि सकारात्मक आहे. तब्येतीच्या तक्रारी समोर येतील.
तूळ : धावपळ होईल
या आठवड्यात मेहनत जास्त करावी लागणार आहे. भागिदारीत व्यवसाय असेल तर फोकस आणि मेहनत महत्त्वाची आहे. काही कारणाने तुमच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळतीलच असे नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार कृती करा, तुमच्या बोलण्यावर ठाम राहा तरच आर्थिक प्रगती साधता येईल. या आठवड्यात प्रवास करताना सावध राहा.
वृश्चिक : अचानक बदल होतील
या आठवड्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार करताना सावध राहा. काही बदल अचानक समोर येतील. त्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. नोकरीत काम वाढते आहे म्हणून चिडचिड करू नका. संपूर्ण आठवडा तुम्ही कुटुंबीयांसोबत सामाजिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहणार आहात.
धनु : लाभ होईल
या आठवड्यात व्यवसायात लाभाचे योग आहेत तर नोकरीत कामाचे कौतुक होईल आणि नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची चांगली संधी मिळेल. संपूर्ण आठवडाभर आर्थिक लाभ असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात. करिअरमध्ये चांगली प्रगती होणार असून शांतता आणि सुखाची अनुभूती होईल. तब्येतीत सुधारणा होणार असून ताणतणाव कमी होईल.
मकर : पदोन्नती मिळेल
व्यवसायात प्रोजेक्टच्या बाबतीत परिस्थिती ज्या प्रकारे पुढे जात आहे त्याबद्दल तुम्ही फारसे समाधानी नसाल. कामाच्या ठिकाणी पुढे जाण्यापूर्वी काही समस्या सोडवाव्या लागतील. अनेक पर्याय तुमच्यासमोर येतील, ज्यामुळे प्रगतीच्या तसेच आर्थिक बळकटीच्या अनेक संधी मिळणार आहेत. अनावश्यक तणावापासून सावध राहा. या आठवड्यात व्यस्त राहाल.
कुंभ : समस्या दूर होतील
या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. आठवडा जसजसा पुढे जाणार आहे प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. या कालावधीत तुम्ही नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याचा किंवा नवीन प्रोजेक्टकडे वळण्याचा विचार करू शकता. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती तुमच्या बाजूने वळणार आहे. आर्थिक समस्या दूर होण्याचे योग आहेत.
मीन : नोकरीत बढती मिळेल
करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात आणि मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. आर्थिक बाबतीत नियोजन करून खर्च केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेमसंबंधात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती आणि संतुलित दिनचर्येकडे लक्ष द्या.
Weekly Horoscope
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…