नाशिक

धन्य धन्य निवृत्तीराया ! काय महिमा वर्णावा..

सिडको : विशेष प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे काल सकाळी सातपूर येथून भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात मंगल प्रस्थान झाले. हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठूनामाच्या अभंगात पालखी पुढे निघाली. आषाढ वारीला दोन शतकांची अखंड परंपरा लाभलेली असून, नाशिकनगरीत प्रत्येक वर्षी भक्तीपूर्वक स्वागत करण्यात येते.
प्रस्थानानंतर पालखीचे सकाळी नाशिक पंचायत समिती येथे आगमन झाल्यानंतर तिचे शासकीय स्वरूपात स्वागत करण्यात आले. नाशिकनगरीतील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात स्वागत केले.
परंपरेनुसार पालखी सोहळा सीबीएस, अशोकस्तंभ, नामदेव महाराज भवन, काजीपुरा या मार्गाने सायंकाळी चार वाजता गणेशवाडी येथे पोहोचला. मार्गावर ठिकठिकाणी पालखीचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. या संपूर्ण वारीत भक्तिभाव, आत्मसमर्पण आणि पांडुरंग चरणी अढळ श्रद्धा यांचे दर्शन घडले. वारकरी, भाविक आणि सेवेकरी मंडळींनी विठूनामात रंगून गेलेली ही पालखी वारी नाशिकनगरीत आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेऊन आज सकाळी नाशिकरोडकडे प्रस्थान ठेवणार असून, पळसे येथे मुक्कामी असणार आहे.

निवृत्तिनाथ महाराज पालखीचे मनपाकडून स्वागत

नाशिक : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी गुरुवारी (दि.12) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दाखल होताच सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारो वारकर्‍यांकडून भगवान पांडुरंगाच्या नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
सालाबादप्रमाणे महापालिका प्रशासनाकडून यंदाही संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीतील हजारो वारकर्‍यांसाठी पालिकेच्या वतीने नाष्ट्याची व्यवस्था केली होती. पांडुरंग व संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या जयघोषात जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि आयुक्त मनिषा खत्री यांनी टाळ वाजवत पंढरपूरला प्रस्थान होणार्‍या वारीत सहभाग नोंदवला. महापालिकेतील सर्व अधिकारी सहभागी झाले. यावेळी महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज यांसह पालखी सोहळ्यातील प्रमुखांची उपस्थिती होती. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नितीन पवार, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, नितीन शिंदे, नितीन राजपूत, गणेश मैदड, रवी बागूल, प्रशांत बोरसे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी उपस्थित होते.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago