महाराष्ट्र

मुलांच्या दप्तरात दडलयं काय ?

नाशिक ः प्रतिनिधी
शाळा महाविद्यालयातील मुलांच्या दप्तरात नक्की दडलयं काय याची पालकांसह शिक्षकांनाही कल्पना नसते.दप्तरात अभ्यासाच्या पुस्तकवह्यांशिवाय अजून काय असणार असे म्हणणारे पालकही आहेत.परंतु जेव्हा अशा काही घटना घडतात कि विचार करायची वेळ येते शालेय महाविद्यालयीन मुलांजवळ अशा गोष्टी आल्या कशा कुठून.नुकतेच पुणे येथे एका मुलाने मैत्रीणीशी का बोलला म्हणून दप्रातील कोयता उगारला.शहरातील नामांकित महाविद्यायातील दोन मुलींचे बॉयङ्गे्रंडवरून भांडणात ङ्गायटरचा उपयोग करून हाणामारी झाली.त्याशिवाय सिन्नर येथील घाटात चार विद्याथ्यांचा अपघाती मृत्यू झाला.तत्पूर्वी ङ्गिरण्यासाठी जायचे तर गणवेशात ओळखले जाऊ म्हणून दप्तरात बदलण्यासाठी कपडे सोबत घेवून निघाले होते.या घटना उघडकिस आल्यामुळे पालकांसह शिक्षक आणि समाजात कळाले यांमुलांजवळ हत्यारे,कपडे दप्रात जवळ बाळगले होते.परंतु अजूनही पालकही अनभिज्ञ आहेत.

 

 

 

 

बारा ते पंचवीस वयोगटातील मुलांच्या दप्तरात महागड्या वस्तु घड्याळ,मोबाइल,खेळणी तसेच चाकू,ब्लेड,गुटखा,मावा,तंबाखू आदी वस्तु आढळतात.मुलांचे तंबाखु,गुटखा खाण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्के वाढले आहे.पालकांच्या परवानगी नसतांना किंवा गैरहजेरीत वाहने सुसाट पळविली जातात.शाळा,कॉलेजला न जाता हुल्लडबाजी,टिंगलटवाळी करतांना आढळतात किंवा सिनेमा,सामुदाईकपणे मोबाइल गेम खेळतांना आढळून येतात.
त्याशिवाय मुले शाळेच्या आवारात न दिसेल अशा ठिकाणी कपडे बदलून बाहेर सहल,ट्रेकिंग,हॉटेलींग,सिनेमा यासाठी बाहेर पडतात.मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवून अशा गोष्टीकडे आकर्षीले जात आहेत.त्यामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर,पुढील आयुष्यावर परिणाम होतांना दिसून येत आहे.

 

 

 

 

एक चांगला नागरिक घडविण्यामध्ये शिक्षकांची मोठी भूमीका असते असे नेहमीच म्हटले जाते परंतु व्यावसायीकरण,स्पर्धात्मक वातावरण सततचा तणाव,अशा गोष्टीसंह विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सामोरे जावे लागते.त्यामुळे मुलांशी कमी झालेला संवाद चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी मेहनत घेणारे शिक्षक अभावानेच आढळतात.
व्यस्त जीवनशैलीत पालकांना मुल वाढवितांना कसरत होते. वेळे अभावी पालकांना मुलांचे दप्तर तपासणे शक्य होत नाही. अगदीच नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या मुलांच्या दप्तरे पालकच भरून देत असतात.मात्र मुले जशी मोठी होतात तशी स्वतः स्कूल बॅग,दप्तर भरतात.घरातील आईवडिल नोकरी व्यवसायानिमित्त थोडाच वेळ मुलांसोबत असतात.त्यामुळे पालक मुलांना योग्य सूचना करीत मुलांना शाळा महाविद्यालयात पाठवितात.

 

 

 

 

 

मुलांना नकळत्या वयात चूकीची माहिती,संगत,आजूबाजूचे वातावरण,दडपण,भिती,तणाव,अभ्यासाचा कंटाळा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मुले कधी व्यसनाधीनतेकडे,गुन्हेगारी कडे वळतांना दिसतात.घरातील किंवा महाविद्यालयीन वातावरण असुरक्षित किंवा तणावाचे स्पर्धात्मक असल्या कारणामुळे मुलांमध्ये असुरक्षित भावना निर्माण होते.पालकांना शिक्षकांना विश्वासात न घेता चुकीच्या गोष्टीकंडे वळतात.मित्र मैत्रिणीसोबत शाळा महाविद्यालयाच्या वेळेत बाहेर ङ्गिरायला जाणे.पार्टीज करणे,साहसी पर्यटन करणे,टे्रकिंगला जाणे आदींचे प्रमाण वाढते आहे.त्याशिवाय व्यसन करण्याकडेही कल वाढलेला दिसून येत आहे. दप्तरात गुटखा,तंबाखूजन्य पदार्थ,सिगारेटसह गर्भनिरोधके,गोळ्यांही सापडल्याचे अनेकदा घटना घडल्या आहेत.
किशोरवयीन मुलामुलींचा संवाद पालकांशी हरवत चालल्याची खंत समुपदेशक सांगतात.तर शिक्षक विद्यार्थी यांनाही शिक्षण घेण्यापुरते मर्यादित ठेवले जात असल्याचे चित्र आहे.

 

 

 

 

 

मुलांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तु आढळतात.पालकांचे दुर्लक्ष होत आहे.शाळा कटाक्षाने मुलांच्या दप्तराची तपासणी वर्गशिक्षकांकडून केली जाते.आक्षेपार्ह वस्तु आढळल्यास काढून घेत पालकांना याबाबत कळविले जाते.पालकांकडून लेखी घेवून समज दिली जाते.पालकांनी वर्गशिक्षकांना वारंवार येऊन भेटणे आणि समन्वय ठेवणे गरजेचे आहे.
एस.बी देशमुख
सचिव नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

 

 

 

 

 

आजकालच्या धावपळीच्या जगात आई वडील दोघेही व्यस्त असतात त्यामुळे मुलांसोबत पाहिजे तेवढा संवाद होत नाही. आपले पाल्य शाळेत किंवा कॉलेजला जाते तर दिवसभरात त्यांनी काय केले याबाबत सुसंवाद झाला पाहिजे. आई वडील आणि पाल्य यात विश्वासाचे नाते वृद्धिंगत झाले पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलाना क्वालीटी टाईम देणे गरजेचे आहे.
ज्योत्स्ना डगळे
समुपदेशक

 

 

 

 

 

Devyani Sonar

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

22 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago