लाईफस्टाइल

मुलांच्या शाळेचा डबा कसा असावा?

मुलांना शाळेच्या डब्यात पौष्टिक अन्न देणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहे. पौष्टिक आहारामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते आणि त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते.
पौष्टिक आहाराचे महत्त्वाचे घटक :
फळे : बेरी, सफरचंद, केळी यांसारखी ताजी फळे व्हिटॅमिन्स आणि फायबरने समृद्ध असतात.
सुकामेवा ः वाळलेले फळ आणि नट्स हे ऊर्जेचा चांगला स्रोेत आहेत.
भाज्या ः मेथी, पालक, शेंगा, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर यांसारख्या सर्व भाज्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असतात.
प्रथिने ः डाळी, उसळी, सोयाबीन, दही, अंडी, चिकन यांसारखे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.
संपूर्ण धान्य ः ब्राउन राइस, क्विनोआ, ओट्स यांसारखे संपूर्ण धान्य फायबर आणि पोषक तत्त्वांंनी समृद्ध असतात.
पौष्टिक डबा तयार करण्याच्या टिप्स ः


डब्यात विविध प्रकारचे अन्न समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवा.
ताजे आणि हंगामी पदार्थांचा वापर करा.
मुलांना आवडतील अशा पद्धतीने अन्न तयार करा.
उदाहरणार्थ मिक्स कडधान्यांच्या भाजणीचे थालीपीठ + शेंगदाणे, तीळ किंवा खोबर्‍याची चटणी किंवा कोथिंबीर- पुदिन्याची चटणी, दही (टोमॅटो सॉस देणे टाळावे.)
मिक्स भाज्यांचा रव्याचा किंवा शेवयांचा उपमा + फुटाणे + हंगामी फळे
मिश्र डाळींचे अप्पे किंवा धिरडे + हिरवी चटणी + सुकामेवा
भाज्या टाकून बनवलेला डोसा किंवा उत्तप्पा + बटाट्याची भाजी + हिरवी चटणी
मसाला ओट्स इडली + सांबर + बदामाचा शिरा
पालेभाज्या + पनीर + बटाटा पराठा + दही + राजगिरा लाडू/ चिक्की.
विविध भाज्या व सोयाबीन टाकून बनवलेला पुलाव+चिक्की+फळे
भाज्या+पनीर+चीज रोल+लाडू+फळ
मुलांच्या आवडीच्या भाज्या टाकून बनवलेले कटलेट्स+हिरवी चटणी+सुकामेवा
मोड आलेल्या कडधान्याची भेळ+मखाने+फळे आदी.
टीप ः (टोमॅटो सॉसऐवजी विविध चटण्या देऊ शकता. जॅमऐवजी साखरआंबा, गुळांबा, मेथांबा यांसारखे पदार्थ देऊ शकता.
चिप्सऐवजी घरी बनवलेला चिवडा, खाकरा, रताळ्याचे, बटाट्याचे काप देऊ शकता. बिस्कीट किंवा कुकीजच्या जागी लाडू किंवा चिक्की देऊ शकता.
ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्यांना पराठे, थालीपीठ, रोल, कटलेट्समध्ये बारीक करून देऊ शकता.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago