नाशिक

परतवाड्यातील आरोपीप्रमाणे खरातवर कारवाई केव्हा?

सोशल मीडियावर नेटकर्‍यांकडून सवाल

नाशिक : प्रतिनिधी
लैंगिक छळ प्रकरणातील परतवाड्यातील आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या घरावरही बुलडोझर चालविण्याची कारवाई केली. या प्रकरणातील आरोपीबद्दल जी तत्परता दाखविली, ती नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातबद्दल का दाखविली नाही? खरातच्या फार्महाउसवर बुलडोझर कधी चालविणार? असा सवाल नेटकर्‍यांकडून सोशल मीडियावर विचारला जात आहे. हाच सवाल ‘उबाठा’ गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही उपस्थित केला आहे.
ज्या तत्परतेने परतवाड्यातील आरोपीवर कारवाई केली, ही तत्परता खरातच्या वेळी दिसून येत नाही. गुन्हेगाराला कोणताही धर्म नसतो. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, असे नेटकर्‍यांचे म्हणणे आहे. काल परतवाड्यातील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला. त्याच्या घराचे जे काही अनधिकृत बांधकाम होते तेवढे पाडण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर अशोक खरात प्रकरणाचे दाखले देत खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले. याच पैशातून त्याने मिरगाव येथे आलिशान फार्महाउस उभारले. तेथे अनेकजण येत असत. त्या फार्महाउसवर कधी बुलडोझर चालविणार? असा सवाल नेटकरी विचारताना दिसून येत आहेत. यासंदर्भातील रील्सदेखील व्हायरल होत आहेत.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
परतवाड्यातील आरोपीच्या घरावर ज्याप्रमाणे बुलडोझर चालवला, त्याचप्रमाणे अशोक खरातच्या फॉर्महाउसवर बुलडोझर कधी चालवणार? रूपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? असे सवाल ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. राज्यात महिलांचे शोषण होत असताना महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे अजूनही शांत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. या प्रकरणात ज्यांचे ज्यांचे नाव आले आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री कधी कारवाई करणार? असेही सुषमा अंधारे
यांनी विचारले.

When will action be taken against Kharat like the accused in Patarwada?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago