नाशिक

म्हाडा घोटाळ्यातील आरोपींना वाचवतेय कोण?

संभाजी बिग्रेडची संबंधितांविरोधात तक्रार दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी
शहरातील 262 एकर म्हाडा भूखंड घोटाळ्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तसेच काही अधिकार्‍यांनी संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात मृतांच्या नावे व्यवहार झाल्याचे तसेच महत्त्वाच्या फायली चोरीला गेल्याचे गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 64/2026 अंतर्गत 149 जणांविरोधात गुन्हे दाखल असतानाही काही विकासकांना निवडक पद्धतीने क्लीन चिट दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडने केलेल्या आरोपांनुसार, भूमी अभिलेख विभागातील काही अधिकार्‍यांनी बनावट स्वाक्षर्‍या व नकाशांचा वापर करून अनधिकृतरीत्या परवानग्या दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मूळ जमीनमालकांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या नावावर व्यवहार करून कोट्यवधींंचा अपहार झाल्याचे पुरावे सादर केल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील 62 एकर जमिनीशी संबंधित महत्त्वाची फाइल चोरीला गेल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. ही बाब प्रशासनातील गंभीर त्रुटीचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना जिल्हाप्रमुख
प्रफुल्ल वाघ, महानगरप्रमुख विकी गायधनी, अनिल आहेर, नितीन काळे, राकेश जगताप, नीलेश गायकवाड, गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Who is saving the accused in the MHADA scam?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago