मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेच्या विशेष महासभेत एसआयआर (मतदार यादी पडताळणी व नकाशीकरण) प्रक्रियेच्या मुद्द्यावरून बुधवारी जोरदार गोंधळ उडाला. या मुद्द्यावरून सत्ताधारी मालेगाव सेक्युलर फ्रंट आणि विरोधी एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तीव्र बाचाबाची होऊन ते एकमेकांना भिडले. परिणामी काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
महापालिकेतर्फे निवडणूक आयोगाच्या बीएलओंना मदत करण्यासाठी मानधन तत्त्वावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याचा ठराव सत्ताधार्यांकडून मांडण्यात आला होता. या नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि त्यासाठी जिल्हाधिकार्यांची मंजुरी घेण्यात यावी, असा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज यांनी नियुक्त्यांच्या नियमावलीसह मानधनाच्या तरतुदींवर आक्षेप घेतला. उपमहापौर शान-ए-हिंद यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान न झाल्याने वादाला सुरुवात झाली.
चर्चा सुरू असतानाच वाद चिघळला आणि महापौरांच्या आसनासमोरच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आमने-सामने आले. इस्लाम पार्टीचे नगरसेवक करण चव्हाण आणि एमआयएमचे हनीफ शेख यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन एकमेकांना धक्काबुक्की झाली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा निषेध करत एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. महासभेला आयुक्त रवींद्र जाधव, नगरसचिव साजिद अहमद यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. गोंधळामुळे काही काळ महासभेचे कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, यापूर्वीही इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये वादाचे प्रसंग घडले आहेत. या घटनेमुळे महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांतील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
गदारोळात ठराव मंजूर
विरोधकांचा विरोध आणि सभात्याग सुरू असतानाच सत्ताधार्यांनी गदारोळातच संबंधित ठराव मंजूर केला. महापौर नसरीन शेख यांनी ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Chaos in the general meeting of Malegaon Municipal Corporation
सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…