गळा दाबून व विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न
सिडको : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून पत्नीला सातत्याने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करणार्या पतीने पैशांची मागणी पूर्ण न झाल्याच्या रागातून पत्नीचा गळा दाबून, तसेच विषारी औषध जबरदस्तीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पतीकडून फिर्यादी पत्नीला कौटुंबिक वादातून वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली जात होती. 12 सप्टेंबर रोजी आरोपीने पत्नीला पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. दुसर्या दिवशी 13 सप्टेंबर रोजी आरोपीने पुन्हा मागील भांडणाची कुरापत काढून पत्नीला शिवीगाळ केली. तसेच, ‘तू माहेरी का निघून गेली नाहीस?’ असे म्हणत तिला बेडवरून खाली पाडले. त्यानंतर तिच्या छातीवर पाय ठेवून दोन्ही हातांनी गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ‘आता विषय संपवतो,’ अशी धमकी देत त्याने ‘क्राकिल’ नावाचे विषारी औषध पत्नीला जबरदस्तीने पाजल्याचा आरोप आहे. त्यानंतरही त्याने तिला मारहाण केली. पत्नीला स्वतःच्या गाडीत बसवून ‘तुला अपघात करून मारून टाकतो,’ अशी धमकी दिली. आरोपीने तिला लोकमान्य हॉस्पिटल, नाशिक येथे नेले. मात्र, उपचारासाठी दाखल न करता तेथेच सोडून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Wife beaten by husband
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…